खासदार निधीतुन रूग्णवाहीका देण्याची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- खासदार निधी अंतर्गत बहुउददेशिय परमपूज्य परमात्मा एक आजाराने कोणालाही सोडलेले नाही, कधी कोणावर कशी सेवक मंडळ मोहाडीला रुग्णवाहिका परिस्थिती ओढावेल हे भेट देण्याची मागणी ब.प.पु.परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडी च्या वतीने खा.सुनिल मेंढे यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात मोहाडी येथे भव्य दिव्य बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक सभागृह आहे. मोहाडी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात, महाराष्ट्रात मोठया प्रमाणात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे सेवक आहेत. त्यांची संख्याही लाखोच्या वर आहे. परंतु जनतेची व सेवकांच्या सेवा करण्याच्या दृष्टीने, रुग्नांना तात्काळ हाँस्पिटल पर्यंत नेण्याच्या सोयीसाठी रुग्णवाहिका खासदार निधी अंतर्गत उपलब्ध करून देण्यात यावी असे निवेदन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनिल मेंढे यांना दिले.

यावेळी बहुउद्देशीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीचे सचिव मोरेश्वर सार्वे, भंडारा येथील परमात्मा एक सेवक सुर्यकांत इलमे, इंदूरखा येथील परमात्मा एक सेवक उमेश मोहतुरे यांनी निवेदन दिले. जीवन अनमोल आहे, सांगता येत नाही, रुग्णवाहिका उपलब्ध असली तर तात्काळ रुग्णाला हास्पिटल मधे घेऊन जाता येतो, सेवा करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचविता येतो, त्या कुटुंबाला दिलासा दिला जातो. यासाठी ही समस्या लक्षात घेता खा.सुनिल मेंढे भंडारा-गोंदिया लोकसभा यांनी आपल्या निधी अंतर्गत रुग्णवाहिका भेट द्यावी असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. वैद्यकीय दुष्ट्या सुसज्ज वाहन असते, रुग्नांना ने-आन करण्यासाठी उपयोगी पडते. रुग्णवाहिका मध्ये सुद्धा उपचार करता येतो.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *