अ‍ॅमेझॉन कडून पाकिस्तानी झेंड्याची विक्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या झेंड्याची आॅनलाईन विक्री केली जात असल्याच्या विरोधात मंगळवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष व इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या गणेशपेठ येथील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले. मनसेने यापूर्वीच भेटण्याची वेळ मागितली होती. मात्र पत्र दिल्यानंतर वेळ न देता कार्यालयाचे दार लावून घेण्यात आल्याने मनसेने संताप व्यक्त करीत आज आंदोलन करीत सर्व कार्यकर्ते थेट दार तोडून आत घुसले.

यामुळे एकच गोंधळ उडाला होता. या आंदोलनात हाती मिळेल, त्या वस्तूची फेकाफेक, खुर्च्या, फर्निचरची तोडफोड करण्यातआल्याने वातावरण चांगलेच तापले होते. मनसे शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.अ‍ॅमेझॉन कंपनीकडून पाकिस्तानी झेंडे आॅनलाईन विकत असल्याच्या विरोधात तसेच हिंदू धर्माविरोधी पुस्तक विकण्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती मनसेचे चंदू लाडे यांनी दिली. अ‍ॅमेझॉनकडून पाकिस्तानच्या झेंड्याची आॅनलाईन विक्री केली जात असल्याबाबत मनसेने खात्री केल्यानंतर एक निवेदन देण्यात आले होते. तरी सुध्दा समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात आले. या कंपनीने तातडीने ही विक्री थांबवावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *