करिअर लॉन्चर क्लासेस तुमसर येथे तालुकास्तरीय युवा उत्सव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : करिअर लॉन्चर क्लासेस तुमसर आणि नेहरू युवा केंद्र, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर लॉन्चर क्लासेस तुमसर येथे शनिवार दि. २० मे २०२३ रोजी तालुकास्तरीय युवा उत्सव घेण्यात आला. यामध्ये वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी संजय लेंगूरे, नेहरु ज्युनिअर कॉलेज तुमसर, दामोदर डहाळे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांडवी, पराग बानासुरे करिअर लॉन्चर क्लासेस तुमसर, नेहरू युवा केंद्र, भंडाराचे तालुका प्रतिनिधी कु. ज्योती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.

या तालुकास्तरीय युवा उत्सवामध्ये वकृत्व स्पर्धा मध्ये घानश्री उरकुडे, पाणेरी निखाडे, सतीश रंगारी, चित्रकला स्पर्धा मध्ये नेहा हजारे, पूर्वेस समरीत, नेहा पारधी व आस्था बडवाईक, छायाचित्र स्पर्धा मध्ये शुभम खोब्रागडे, शुभम वणवे, कुषांक सपाटे, काव्यलेखन स्पर्धामध्ये स्वार्थी करमकर, पौर्णिमा चौधरी, दिक्षा शेंडे या सर्वांची निवड ही जिल्हास्तरीय युवा उत्सव करिता झाली. या करिता आयोजकांनी त्यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *