घरफोडी करणाºया आरोपीला अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शहरालगत असलेल्या न्यु शिवाजी नगर नहर रोड भंडारा येथील मिना सुदर्शन पवनीकर यांच्या घरी घरफोडी करणाºया आरोपींला भंडारा स्थागुशा च्या अधिकाºयांनी अटक करीत त्याच्या ताब्यातुन चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पंकज श्रावण आकरे वय ३१ वर्षे रा.पिंपळाफाटा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन दुसरा आरोपी आकाश उर्फ गोलु दिलीप रेवाडीया वय ३० वर्षे रा.मानेवाडा याचा पोलीस शोध घेत आहेत. दि.१८ मार्च २०२४ रोजी भर दुपारी न्युशिवाजी नगर नहर रोड केसलवाडा येथील श्रीमती मिना सुदर्शन पवनीकर वय ४३ वर्षे हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले असता आरोपींनी त्यांच्या घरी घरफोडी करून १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पो.स्टे. भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्याकरीता भंडारा स्थागुशा च्या पथकानेसंपुर्ण परिसरातील सि.सि. टि.व्हि.कॅमेरा फुटेजची पाहणी करून अज्ञात आरोपींचे सि.सि. टि.व्हि. फुटेज प्राप्त केले व त्या आधारे संशयीत आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान आरोपीतांचा शोध घेत मौदा नागपूर परिसरातील घरफोडीचे आरोपी तपासलेत्या तपासणी मध्ये स्था.गु.शा. पथकाला फुटेजमधील संशयीत इसम हे नागपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले.त्यानुसार स्था.गु. शा. पथकाने नागपूर पिंपळाफाटा हुडकेश्वर येथे राहणारा पंकज श्रावण खाकरे याला ताब्यात घेत आरोपी कडून कसेलवाडा येथील घरफोडीतील १ लाख ४० हजार रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले .

सदर आरोपीची अधीक चैकशी केली असता आरोपीने त्याचा साथीदार गोलू रेवाडीया याच्यासोबत मिळुन भंडारा शहर परिसरात १ व ग्रामीण परिसरात १ अशा दोन ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगीतले. अटकेतील आरोपीकडून एकूण ३ गुन्हयातील मुद्देमाल सोना-चांदीचे दागिने आणि रोख एकूण १ लाख ७३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . गुन्हयातील दुसरा आरोपी आकाश उर्फ गोलु दिलीप रेवाडीया याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे ,यांचे मार्गदर्शनात भंडारा स्थागुशाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर स.पो.नि.नारायण तुरकुंडे, पो.हवा. प्रदीप डाहारे,पो.हवा.किशोर मेश्राम,पो.हवा.सतीश देशमुख, पो.हवा. रमेश बेदुरकर, पो.हवा.अजय बारापात्रे, पो.अं. शैलेश बेदुरकर व भंडारा स्थागुशा च्या कर्मचाºयांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *