गाठी व्यवसायातून कामगारांना मिळतो एक महिना रोजगार

यशवंत थोटे मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे गाठी व्यवसायात चक्क आता महिला बचत गटांची एंट्री झाली असून होळीनिमित्त परंपरागत गाठी व गुलाल देण्याची पद्धत आहे. त्यासाठी काही व्यावसायिकच होळीचा सण येते. यापूर्वीच गाठी व्यवसायाला सुरुवात करायचे मात्र परंपरात गाठी व्यावसायिकांप्रमाणे आता चक्क महिला बचत गटांमार्फत ही ह्या व्यवसायात लाखोची उलाढाल होत आहे. त्यांमुळे स्थानिक कामगारांना एक महीना रोजगार मिळत आहे. हिंदू संस्कृतीत होळीला पुजेचा विशेष महत्व आहे. त्यांमुळे “होलीका” मातेची पूजा म्हटली की, होळीला गाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. होळी रे होळी पुरणाची पोळी होळी मातेला साखरेची गाठी… अशा उच्चाराने होळी मातेची पूजा करून गुलालाची उधळण करण्यात येत असते. त्यामुळे होळीसणाच्या पर्वावर पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आजही पिढीजात बांधव साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाºया या “गाठीला “अनन्य साधारण महत्व आहे. मात्र ह्या व्यवसायात जिल्ह्यातील महिला बचत गट ही उतरल्या आहे.

रंगाचा सण म्हणून होळी हा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून हाच उत्सव कित्येकांना महीण्याभराचा हाताला रोजगार सुद्धा देत असतो. त्यात, गुलाल बनविणाºयापासून तर पिचकाºया बनविणाºया असंख्य कामगारांचा यात समावेश असतो. मात्र होळी दहनाचा दिवशी पुरणपोळी सोबतच होळीला गाठ्यांचा नैवेद्य देण्याची प्रथा असून आजही भंडारा शहरासह “गाठ्या” बनविणारे पिढीजात परिवार आजच्या घडीला ग्रामीण भागात सुद्धा गाठ्यांची निर्मिती पारंपरिक पद्धतीने करीत आहेत.

या पिढीजात व्यवसायात मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील आता लक्ष्मी महिला बचत गटांमाध्यमातून रोजगाराची निर्मिती होऊन गाठ्यांचा विक्रीतून दरवर्षी लाखोची उलाढाल एकट्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगावातून होत आहे तर या गाठ्यांच्या माळा तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात साखरेला वितळवून त्याचा “पाक” तयार करण्यात येत असतो व हाच गरम, गरम पाक लाकडाचा बनविलेल्या साच्यात हळुवारपणे टाकुन त्याला थंड होऊ दिल्यानंतर अशा प्रकारे गाठ्यांच्या माळा अगदी १० मिनिटात तयार होत असते. त्यामध्ये ५० ग्रामपासून तर एक किलोपर्यंच्या गाठ्यां ह्या आंधळगाव येथील संतोष ठाकरे यांच्या छोटेखानी गाठी कारखान्यात ठिकाणी तयार केल्या जातात. मागील २ वर्षापासून कोरोनाने उतळली कळा आलेल्यां या व्यवसायाने आता थोडी भरारी घेतली आहे. त्यालाच मागीलवर्षी भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आंधळगाव येथील करणाºया लक्ष्मी महिला बचत गटातील सदस्यांना भेट देऊन त्यांच्या गटात संबंधी विकास भावा केलेल्या कामाचा गौरव करून त्यांचे मन प्रफुल्लित केले. जिल्ह्यातील आंधळगाव येथे पिढीजात विणकरांप्रमाणेच गाठ्या बनविणारे कामगार देखील मोठ्या प्रमाणात होते मात्र बदलत्या काळाप्रमाणे आज त्यांची संख्या कमी होत गेली.

आजचा घडीला गाठ्यांचा व्यवसाय हा भंडारा, तुमसर व पवनी या तीन तालुक्यापर्यंतच सीमित राहिला होता.मात्र ह्यात जिल्हा परिषदेच्या मार्फत महिला बचत गटाना प्रशिक्षण दिल्याने त्यात महिला बचत गट शामिल झाले असून संपुष्टात येत असलेल्या ह्या व्यवसायाला नव संजीवनी मिडाली आहे. आंधळगाव येथील पुरुषोत्तम ठाकरे यांचे अगोदरचे छोटे किराण्याचे व्यवसाय असायचे चालते होळीनिमित्त बाहेरून काठी घेऊन गावोगावी विकायचे, त्यातच त्यांना १९९५ पासून हा गाठी व्यवसाय करण्याच्या सूचला, आज ते मागील पाच वर्षापासून महिला बचत गटाच्या सहकार्याने आंधळगाव येथील लक्ष्मी बचत गट पत्नीच्या द्वारे स्थापन करून गटातील महिलांना उद्योजक देण्याचे काम करीत आहेत. आता त्या व्यवसायात त्यांचे मुले सुद्धा त्यांना हातभार लावत संपूर्ण गाठी जिल्ह्यात तरच नागपूर वर्धा गोंदिया चंद्रपूर आदी ठिकाणी ट्रकद्वारे गाठी पोहोचवण्याच्या काम करीत आहेत. त्यामुळे त्या व्यवसायातून ठाकरे परिवारासह महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक उत्पन्न प्राप्त होऊन त्या महिलांना दीड ते दोन महिन्याच्या रोजगार संधी प्राप्त करून देण्याचा आनंद होत असल्याचे संतोष ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे अस्सल साखरेच्या पाकापासून बनणाºया या गाठ्यांचा गोडवा चखताना एकदातरी या कामात २४ तास भट्टीसमोर काम करणाºया या कामगारांच्या मेहनतीला जरून आठवण करा, जेणेकरून त्या गाठ्यातील गोडवा असाच कायम राहील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *