शासकीय जागवरील अतिकमण काढले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : मोकळ्या शासकीय जागेवर सभोवतालच्या शेतकºयांनी केलेले अतिक्रमण हटविण्यासाठी तत्कालीन सरपंचांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथील १६२ एकर शासकीय मोकळ्या जागेवरील २१ एकर जागेवर येथीलच कमी अधिक २५ शेतकºयांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे, हे अतिक्रमण हटविण्यासाठी तत्कालीन सरपंच राहून मेश्राम यांनी पुढाकार घेवून विशेष धडपड राबविली होती. तर, त्याच्या त्या प्रयत्नाला यश आले असून १७ फेब्रुवारी रोजी सदर अतिक्रमण हटविण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील गवराळा येथे गट क्र.६५/१ व ४९ या गटाची ६५हेक्टर म्हणजे १६२.५ एकर शासकीय जागा होती.
ही जागा मोकळी असून सभोवताल शेतकºयांच्या शेतजमिनी होत्या. मात्र, शासकीय जागा मोकळी असल्याने सभोवतालच्या कामी अधिक २५ शेतकºयांनी खाजगी विहिरीसह त्या शासकीय मोकळ्या जागेवर अनधिकृत रित्या अतिक्रमण केले होते. दरम्यान, गवराळा येथील तत्कालीन सरपंच राहून मेश्राम यांनी सदर शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा लावून धरला आणि हे अतिक्रमण हटविण्यासाठी कंबर कसली. याकरिता त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय तथा संबधित कार्यालय, अधिकाºयांकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच तत्कालीन सरपंच राहुल मेश्राम यांनी २८ जून २०२२ रोजी ग्राम सभेत सदर जागेची मोजणी करून अतिक्रमण हटविण्यासंबंधाने ठराव घेतला. आणि भूमी अभिलेख कार्यालयात सदर जागेचे दोनदा मोजणी शुल्क भरून मोजणी करून घेतली. दरम्यान, दि.८ आॅगस्ट २०२२ रोजी भूमी अभिलेख विभागांतर्गत गट क्र.६५ /१ व ४९ या दोन्ही गटांची मोजणी करण्यात आली. या मोजनिमध्ये कमी अधिक २५ शेतकºयांनी ३ खाजगी विहिरीसह एकूण २१ एकर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले. त्यामुळे, गट क्र.६५/१ व ४९ या शासकीय जागेवर अतिक्रमण करणाºया सभोवतालच्या त्या शेतकºयांना नोटीस बजावण्यात आले.
आणि अखेर दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी नवीन ग्राम पंचायत कार्यकारिणीच्या कार्यकाळात त्या ६५ हेक्टर जगेपैकी २१ एकर शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. सुरक्षा बाधित होऊ नये म्हणून पोलिसांच्या चोख बंदोबस्ताखाली सदर अतिक्रमण हटविण्यात आले. गत २ वर्षात सदर अतिक्रमण हटविण्यासाठी तत्कालीन सरपंच राहुल मेश्राम यांनी विशेष धडपड केली आणि कार्यकाळ संपल्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने गावात त्यांचे कौतुक केले जात आहे. सदर अतिक्रमण हटवितेवेळी, माजी सरपंच राहुल मेश्राम, येथील नवनिर्वाचित सरपंचपंकज राऊत तथा ग्राम पंचायत कमिटी, तं.मु.समितीचे अध्यक्ष नंदा ढोंगे तथा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *