गणेशोत्सवाच्या माध्यमातून हनुमान व्यायाम मंडळामार्फत राबविले विविध उपक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी या गावात मागील आठ वर्षांपासून आगळावेगळा देखावा बनवून गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. सध्या गणेशोत्सवनिमित्ताने अनेक गणेश मंडळ समाजहिताचे प्रबोधन कार्यक्रम गावात राबविततात. मोहाडी तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहगावदेवी या गावात समाजप्रबोधन जनजागृती करण्याचे काम हनुमान व्यायाम मंडळाचे सदस्य गणेशोत्सवचा माध्यमातून मंगळवार दि.१९ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत साजरा करण्यात आला. यावर्षी मूर्तीदेणगी निशांत अरुण डोकरीमारे यांनी दिली. मूर्ती स्थापना मंगळवार दि.१९ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी ७.१५ वाजता करण्यात आली.

यानिमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकल नृत्य स्पर्धात आश्लेषा लांजेवार, समृद्धी साठवणे, वृद्धाश्रम काळाची गरज निंबध स्पर्धात सलोनी बाळबुधे, फॅशन शो स्पर्धा एकपात्रीत मुकेश साठवणे फॅशन शो स्पर्धा दोन पात्रीत सोबत लेंडे, शिवम लेंडे चित्रकला स्पर्धात (मंदिराचे दृश्य) तेजसी वाडीभस्मे, श्रावणी काळे, सामूहिक नृत्य स्पर्धात अ गटात पल्लवी काळे, तनुजा लेंडे, पायल लेंडे, हिमांशी डोकरी मारे, ब गटात आरोही लेंडे, नंदनी लेंडे, राणी लेंडे, क गटात सृष्टी लेंडे, सताक्षी बाळबुधे, दिव्यांशी बाळबुधे, स्वराली लेंडे, रीया लेंडे, रांगोळी स्पर्धा अ गटात अमिषा पेलने तर ब गटात आरोही लेंडे, नाटक स्पर्धा पल्लवी काळे, निखिल काळे, आयुष बावनकर, हिमांशी डोकरीमारे, भाग्यशाली विजेता नमन हेमराज ठरले. मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार दि.२४ सप्टेंबर २०२३ ला सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत नेत्ररोग तज्ञ डॉ.आशा लांजेवार, स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रियंका नाकाडे, जनरल फिजिशियन डॉ.शरद गोमासे, बी.पी.सुगर तपासणी दिनकर बाळबुधे यांनी १५० च्या जवळपास रुग्णाची तपासणी केली.

या सर्वांना समर्पित असा गणेशोत्सव शासनाने दिलेल्या निर्देशांच्याप्रमाणे मोहगाव येथील गणेश मंडळ साजरा करीत असतांना चित्र दिसून आले. यावर्षी मोहगावदेवी या गावात गणराय संत गोरा कुंभार देखावा तयार करण्यात आला होता. मार्गदर्शक रामकृष्ण चकोले, नरेश दिपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान व्यायाम शाळा गणेशोत्सव मंडळ मोहंगावदेवी अध्यक्ष गोपाल मडामे, उपाध्यक्ष शैलेष वाडीभस्मे, सचिव राहुल चकोले यांच्या नेतृत्वाखाली मुलचंद आंबीलकर, रामा लांजेवार, राजेश लेंडे, मनोहर ठवकर, कोमेश लवकर, भगवान लेंडे, संतोष लांबट, धनलाल भाजीपाले, श्रावण चकोले, निलेश लांबट, ओमेस्वर पडोळे, श्रावण पडोळे, वसंता चोपकर, नाना लेंडे, दादाराम साठवणे, विकास बाळबुधे, नरेश ठवकर, सिताराम कडव, वसंता लांबट यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, चंद्रशेखर साखरवाडी यांनी केले. बक्षीस वितरण शुक्रवार दि.२९ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता वरठी पोलीस स्टेशन ठाणेदार अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.

गावातील अमोल राधेश्याम लेंडे, सतीश विनोद डोकरेमारे, रोहित धनराज बुडे यांची अग्नीविरमध्ये निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. मोहंगावदेवीचे दिवाकर बाळबुधे यांच्याकडून खुली सामूहिक नाटक स्पर्धा, अभिनय व सामाजिक प्रबोधनला प्रथम २ हजार ५०० रुपये तर दुसरा १ हजार ५०० रुपये देण्यात आले. भाग्यशाली विजेत्यांना अर्थव विमा सेवा केंद्राकडून भारतीय जीवन विमाची पाच लाखांची पॉलीशीची १ ली तीमाही किस्त, साई दुग्ध संकलन केंद्राकडून ३ लिटर दुध,परमात्मा एक दुग्ध संकलन केंद्रकडून ३ लिटर दही, प्रत्येक स्पर्धातील विजेत्यांना स्टडी टेबल,सहभागी स्पधार्काच्या एका विजेत्यास भेटवस्तू देण्यात आले. शनिवार दि.३० सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी ६.०५ वाजता श्रीगणेशची शोभायात्रा काढून सुरनदीच्या तीरावर सायंकाळी ७.३० वाजता विसर्जन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.