३४ वर्षीय तरूणाचा नदीत बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालोरा : नदी काठावर पार्टी करायला गेलेल्या युवकाला नदीत आंघोळ करण्याचा मोह आवरता न आल्याने त्याचा नदीत बुडुन मृत्यू झाला.विनोद रविंद्र चामट वय ३४ वर्षे रा.करडी असे मृतकाचे नाव आहे.सदर घटना दि.१ आॅक्टोंबर रोजी घडली. मृतक विनोद रविंद्र चामट हा युवक त्याचा मित्र रमेश साठवणे, आशीष जगणित यांच्या सोबत पार्टी करण्याकरीता मुंढरी वैनगंगा नदीवर गेला होता दरम्यान तो नदीपात्रात आंघोळ करण्याकरीता पाण्यात गेला असता त्याचा पाण्यात डूबून मरण पावला . त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरीक धावुन गेले व त्यांनी विनोद चा शोध घेण्यास सुरूवात केली असता विनोदचे प्रेत आढळून आले नाही आज दि २ आक्टोबंर २०२३ रोजी सकाळी विनोदचा प्रेत पाण्याव तरंगतांना दिसुन आले. फियार्दी श्रीमती रेखा रविंद्र चामट वय ५५ वर्ष रा करडी यांच्या तक्रारीवरून करडी पोलीसांनी मर्ग दाखल केला असून थानेदार राजेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार प्रफुल्ल वालदे , पोलीस हवालदार अर्पित भोयर करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.