अवैध रेती वाहतुक करतांना दोन टिप्पर पकडले !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : बोगस रॉयल्टीच्या आधारे गोंदिया जिल्ह्यातील तिरोड्यावरून उमरझरी मार्गे साकोली येथे अवैध रेती वाहतूक करीत असलेले दोन टिप्पर पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अवैध रेती वाहतूक करताना ७० लाख ४४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथून वैनगंगा नदी पात्रातील बोगस रॉयल्टी बनवून अवैध रित्या रेतीची वाहतूक करण्यात येत होती. नागझिरा अभयारण्यातील कोअर झोन मधील तिरोडा उमरझरी मार्गावरून भर दिवसा व रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडत होता. याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली असता गुप्त सूचनेच्या आधारावर महसूल विभाग साकोली व साकोली पोलीस स्टेशनच्या संयुक्त धाडसतरामध्ये गुरुवार दिनांक १३ आॅक्टोबर च्या रात्री आठ पंधराच्या सुमारास धाड टाकून दोन टिप्पर रेतीची अवैध वाहतुक करताना दिसले. तपासणी केली असता वाहतूकपरवाना ही मुदत संपली होती व रात्री वाहतूक करत असताना MH 35 AJ-2111 आणि MH 35 AJ-1004 जप्त करण्यात आली. हे टिप्पर गौरव चौरसिया तिरोडा यांच्या मालकीची आहेत. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींमध्ये रोहित येठरे राहणार मुर्झा व प्रकाश दोहरे साखरीटोला व राजू देवगळे राहणार अर्जुनी तालुका तिरोडा यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आपल्या कर्मचाºयांसह सापळा रचून १३ आॅक्टोबर च्या रात्री सात वाजता वन विभागाच्या उमरझरी गेटवर बोगस रॉयल्टी च्या आधारावर अवैधरित्या वाहतूक करणारे रेतीने भरलेले दोन टिप्पर जप्त केले आहे. या धाडसत्रामध्ये साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गौतम, पोलीस हवालदार अमित वडेटीवार, नाना भलावी, महसूल विभागाचे महसूल निरीक्षक यशवंत चौधरी, तलाठी रणजीत शरणागत, सुरेंद्र बाळबुद्धे, शेखर ठाकरे धाडसत्रामध्ये सहभागी होते. बाम्पेवाडा उमरझरी ते तिरोडा हा रस्ता नागझि- रा अभयारण्यातून जातो. या परिसरातून रात्री बे रात्री वाहतूक सुरू असते. जाणाºया येणाºया वाहनाची फक्त नोंद घेतली जाते. एकीकडे जिल्हाधिकाºयांनी व पोलीस अधीक्षकांनी अवैध व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दुसरीकडे ग्रामीण व जंगल परिसरातील अंतर्गत सोयीच्या मार्गाने बीट अंमलदार व संबंधित विभागाच्या कर्मचाºयांना मॅनेज करून अवैध रेती वाहतुकीच्या प्रकार राजरोसपणे सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *