राष्ट्रीय स्तरीय अ‍ॅबॅकस स्पर्धेत साकोली येथील मुला-मुलींनी मारली बाजी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : जिनियस चॅम्प्स अकॅडमी तर्फे राष्ट्रीय स्तरीय अ‍ॅबॅकस स्पर्धा रविवार, ४ जून रोजी गुरुदेव नगर नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील नर्सरी कॉलनी शाखेतील ४४ विद्यार्थी शर्मिला राजेशसिंह कछवाह यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीयस्तरीय अँबॅकस स्पर्धेत नागपुरात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांसाठी मेंटल कॅल्क्युलेशन, टेबल रायटिंग अशा सहा पातळीवर ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी स्पर्धेनंतर लगेच निकाल घोषित करण्यात आला. बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिंधूताई सपकाळ यांनी गौरविण्यात आलेल्या विदर्भाची माई म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री विजया मारोतकर व प्राचार्य संयोगिता जोशी प्रामुख्याने उपस्थित होत्या. पोरी जरा जपून… या काव्यात्मक कार्यक्रमातून असंख्य विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाºया विजया मारोतकर यांनी जीनियस चॅम्प्स अकॅडमीच्या मुलांना प्रेरणात्मक मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून, कमी मार्क्स मिळविलेल्या विद्यार्थ्यांना धीर देत आपणही पुढे कसे जाणार यावर उत्कृष्टपणे माहिती दिली. याप्रसंगी जीनियस चॅम्प्स अकॅडमीच्या कार्यवाह डॉ. जयश्री राम घाटबांधे यांनी विद्यार्थ्यांना अबॅकस आणि प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल दळवी आणि शासकीय अभियांत्रिकी सीएस प्रथम वर्गाची विद्यार्थ्यांनी चिन्मय घाटबांधे हिने उत्कृष्टपणे मुलांना विविध मनोरंजनात्मक खेळ, अ‍ॅक्टिव्हिटीज शिकविले व उत्साह वाढविला. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राम घाटबांधे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रथम श्रेणी: पियुष खुजे,छवी समरीत, मोनाली राऊत तर आरोही गोबाडे ही ज्युनीअर लेव्हलमध्ये तिस-या क्रमांकाची विजेती ठरली. विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पुर्वेश करजेकर, मानस हटवार, हितेश डोंगरवार, निधी पालीवाल, प्रथा तन्वानी, रिद्धी रहांगडाले, आयुष राऊत, कल्याणी पाखमोडे, उत्कर्ष कापगते, टिकेश भाजीपाले, प्रणव अग्रवाल, मृणमय शिवणकर, आशीष बोपचे, युवांश गायकवाड, पार्थ खोटेले, देवश्री कापगते व चैताली लांजेवार यांना सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसह असंख्य पालक वर्ग उपस्थित होते. त्यांनी हा पुरस्कार सोहळा न भूतो न भविष्यती असाच असल्याची दाद दिली व संस्थेच्या कार्यवाह जयश्री घाटबांधे सह इतर सहकाºयांचे मन:पूर्वक कौतुक केले. याप्रसंगी शर्मिला कछवाह यांनी संचालन तर विद्या खरकटे यांनी आभार व्यक्त केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *