लाखनीत खुनाचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : लहान भावासोबत भांडण कशाला केले या कारणावरून शिवीगाळ करून थापड-बुक्क्यांनी मारहाण करून तसेच लोखंडी सूरी ने डोक्यावर, डोळ्याच्या खाली गालावर, तळहातावर व कानावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना केसलवाडा (फाटा)परिसरात रविवारी (ता. १६) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. विशाल सुनील भिवगडे वय २४ व रोहित वाघाये वय १९ असे जखमींचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे उपचार सुरू आहे. तर अभिशेख कटकवार रा. पोहरा, मयंक तिवारी रा. भंडारा व इतर २ असे आरोपींची नावे आहेत. विशाल भिवगडे हा त्याचा मित्र आकाश गडकरी याचे रूमवर झोपला असता त्याला फोन करून मयंक तिवारी याने केसलवाडा (फाटा) येथे बालविले. त्यावेळी विशाल त्याचा मित्र रोहित वाघायेसह केसलवाडा (फाटा) परिसरात गेले. त्यावेळी खुनाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींनी गंभीर जखमी विशालला आरोपी अभिशेख कटकवार याने माज्या लहान भावासोबत भांडण कशाला केले या कारणावरून शिवीगाळ करून थापड-बुुक्क्यांनी मारहाण केली.

तर मयंक तिवारी याने मागेहून येवून लोखंडी सूरी ने डोक्यावर, डोळ्याच्या खाली गालावर, तळहातावर व कानावर वार करून गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा विशालचा मित्र रोहित वाघाये हा अडविण्यासाठी आला असता त्याच्याही डोक्यावर लोखंडी सुरीने मयंक तिवारी याने वार केले. व घटनास्थळावरून पसार झाले. घटनास्थळावर उपस्थित मित्रांनी दोघांनाही उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना दिली. लगेच ग्रामीण रुग्णालयात पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस उपनिरीक्षक गौरी उईके पोलिस हवालदार निरज साबळे पोहचले. व जखमीची आस्थेने विचारपूस केली. दोन्ही जखमींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली. वैद्यकीय अहवालावरुण व जखमीच्या तक्रारीवरुण लाखनी पोलिसांनी अप. क्र. २१७/२०२२ कलम ३०७,३२३, ५०४,३४ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *