सोमलवाडा येथे मंडई निमित्त दंडारी चा कार्यक्रम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : मोजा सोमलवाडा येथे नवमीच्या पर्वावर मंडई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोककलेच्या वारसा असलेल्या या उत्सवात गावातील लोकशाहीर प्रभुजी बुराडे यांचा दंडार या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हेमंतभाऊ अतकरी यांच्या हस्ते सतीश टिचकुले, अध्यक्ष श्रीराम दूध डेअरी लाखनी, विनोद अतकरी माजी सैनिक, अमित झुल्पीकार हुमणे शिक्षक, गोपीचंद मते, दामोदर बुराडे, अशोक बडगे, बाळूजी बुराडे, देवाजी फंदे,बाळकृष्णा टिचकुले , राहुल नखाते, सिकंदर धुर्वे शालिकराम भलावी, सुकल टिचकुले, हिरामण मारवाडे, रामचंद्र वघरे, तसेच पंचशील दंडार मंडळातील संपूर्ण कलाकार व गावकरी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *