मुलीने लग्नास नकार दिल्याने युवकाची ३०० फूट टॉवरवर विरुगिरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : मुलीने लग्न करण्यास नकार दिल्याच्या नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने युवकाने शोले स्टाईल ३००0 फुट उंच मोबाईल टॉवरवर चढून ‘विरुगिरी’ केल्याची घटना आज २२ नोव्हेंबर रोजी देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दीपककुमार रेनसिंह सलामे (२४) असे त्याचे नाव आहे. दरम्यान तब्बल चार तासाने त्याला टॉवरवरुन खाली उतरविण्यात पोलिस व ग्रामस्थांना यश मिळाले. दीपककुमार सलामे याला छत्तीसगड राज्यातील एका तरुणीने लग्नाकरिता नकार दिला होता. या कारणावरुन आत्महत्या करण्याचा उद्देशाने तो गावातील ३०० फुट मोबाईलवर चढला. दरम्यान ग्रामस्थांनी त्याची समजूत काढून खाली उतरण्याचे प्रयत्न केले. तसेच चिचगड पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार शरद पाटील व त्यांचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोबाईलवर युवकाशी सातत्याने बोलणे करुन त्याला टॉवरखाली येण्यासाठी प्रवृत्त केले. चार तासाच्या प्रयत्नानंतर पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने तो खाली उतरला व सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *