तिसºया दिवशी मिळाला नाल्यात वाहून गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा मृतदेह

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया येथे झालेल्या झालेल्या मुसळधार पाऊस झाल्याने रिंग रोड लगतच्या नाल्यात २१ सप्टेंबर ला दुचाकीसह वाहून गेलेल्या रणजितसिंग प्रतीमसिंग गिल (वय २१) या युवकाचा आज तिसºया दिवशी टेमनी नाल्यालगत मृतदेह आढळून आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे शोध व बचाव पथक व अग्निशमन दलाने हे शोधकार्य राबविले. गोंदिया शहरात २० सप्टेंबर च्या रात्री मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती. २१ सप्टेंबर पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसाच्या पाण्यामुळे आणि धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नाले दुथडी भरून वाहत होती. दरम्यान, बुधवारी रणजितसिंग गिल हा युवक रिंग रोड लगतच्या नाल्यात दुचाकीसह वाहून गेला होता. त्यानंतर लगेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाने शोधकार्य राबविले. परंतु, बुधवारी दिवसभरात रणजितसिंग आणि त्याची दुचाकी आढळून आली नव्हती. त्यामुळे सायंकाळी सहानंतर शोधकार्य थांबविण्यात आले. पुन्हा गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य राबविण्यात आले. गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास नाल्या त दुचाकी आढळून आली. परंतु, रणजितसिंग गिल याचा शोध लागला नव्हता. त्यामुळे पुन्हा शुक्रवारी (ता. २३) शोधकार्य राबविण्यात आले. यावेळी टेमनी नाल्यालगत त्याचा मृतदेह आढळून आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *