खा. प्रफुल पटेल व सौ. वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य निदान व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आज स्थानिक पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालयात खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुंजाभाई पटेल शिक्षण महाविद्यालय व बाहेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर च्या वतीने आरोग्य निदान व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी आमदार व गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, गोंदिया शिक्षण संस्थेचे संचालक निखिल जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिव स्मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

या शिबिराला गोंदियाचे प्रतिष्ठित डॉ दिपक बहेकार, डॉ रोशन कानतोडे व डॉ लोकेश मोहबे यांच्यासह डॉ नितेश नागभीरे, डॉ अनुराग बहेकार, डॉ गार्गी बहेकार, डॉ मनीष चोखंदरे, डॉ सतीश बन्सोड, डॉ कविता भगत, डॉ सोनल अग्रवाल, डॉ कंचन भोयर, डॉ हर्षा कानतोडे, डॉ रिचा कोडवानी, डॉ लोकेश चतुर्भुज, डॉ निकिता खापर्डे, डॉ आचल उके, डॉ तुषार सोनवाने, डॉ नीता चौधरी, डॉ दुर्गाप्रसाद नागपुरे सह त्यांच्या पथकांनी विशिष्ट सेवा प्रदान केली. यात हृदय रोग, मधुमेह, इसीजी, हड्डी रोग, स्त्री रोग, ब्लडप्रेशर, ब्रेन विकार, त्वचा रोग, पोटाचे विकार, लकवा इत्यादी रोगांची तपासणी करण्यात आली. शिबिराला परिसरातील ३०० पेक्षा अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.  तसेच शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड ची नोंदणी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व नागरिकांनी खा. प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल यांना दीर्घायुष्य व निरोगी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, निखिल जैन, मनोहर वालदे, प्राचार्य डॉ आर एल निकोसे, आशा पाटील, सुशीला भालेर- ाव, सुनील भालेराव, विनीत सहारे, रफिक खान, केतन तुरकर, नागो बन्सोड, प्रा.एस आर पाटील, प्रा.मीनाक्षी कटरे, प्रा.विनोद गेडाम, करण टेकाम, आरजू मेश्राम, वैद्यकीय चमू, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सहित बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

खासदार प्रफुलभाई पटेल यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोज शुक्रवारला सकाळी १०:१० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय भंडारा कडून सार्वजनिक वाचनालय समोर गांधी चौक भंडारा येथे खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुद्धे व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या अध्यक्षतेखाली केक कापून व बुंदी वाटप करुन वाढदिवसाचा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड जयंत वैरागडे, डॉ जगदीश निंबार्ते, डॉ श्रीकांत वैरागडे, अ‍ॅड विनयमोहन पशिने, महेंद्र गडकरी, बाबुराव बागडे, राजु हेडाउ, युवक अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, पं.स. सभापती रत्नमाला चेटूले, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, अश्विन बांगडकर, व्यापारी सेल अध्यक्ष राहुल निर्वाण, सेवादल अध्यक्ष गणेश चौधरी, प्रा.नारायणसिंग राजपुत, शरद (आरजु) मेश्राम, शहर अध्यक्षा सौ. मंजुषा बुरडे, युवती अध्यक्ष अ‍ॅड. नेहा शेन्डे, किर्ती गणविर, आशिष दलाल व फार मोठया संख्येने प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *