छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा २०२३ प्रथम जल्लोष ‘शिवस्फूर्ती मॅराथॉन’ संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : पोलिस स्टेशन तुमसर अणि छत्रपती शिव- शंभू प्रतिष्ठानच्या संयुक्तिक आयोजनातून दिनांक १७ फेबु्रवारी २०२३ रोज शुक्रवारला नवीन बसस्थानक जवळ व मातोश्री सभागृहाच्या भव्य प्रांगणात प्रत्येकी खुल्या गटातून मुले ८ कि. मी व मुली ६ कि. मी अशा शिवस्फूर्ती मॅराथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत विजयी ठरलेले पुरुष गटात अनुक्रमे नागराज खूरसने, नागपूर, शादाब पठाण नागपूर, राकेश भांडारकर तर महिला गटातून अनुक्रमे कु. प्राजक्ता गोडबोले नागपूर, कु. प्रियंका बोपचे पिपरीचुन्नी, कु. श्वेता धांडे पालोरा यांनी पारितोषिक पटकाविले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी प्रदीपदादा पडोळे माजी नगराध्यक्ष, अभिषेकदादा कारेमोरे, माजी नगराध्यक्ष दीपक थोटे, पंकज बालपांडे, आशिष कुकडे, माजी नगराध्यक्षा श्रीमती गीताताई कोंडेवार, कांचनताई पडोळे, कल्याणीताई भुरे, कुंदाताई वैद्य, प्रीति मलेवार, आदिति कालबांडे, पल्लवी पाटिल, मीराताई भट इत्यादीं मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाची धुरा सुधाकर कहालकर, उमेश भेलावे, रमेश बोंद्रे तर वैद्यकीय सेवा सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील डॉ. विजय पारधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सांभाळली.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलिस स्टेशन तुमसरचे श्रीमती रश्मीता राव सहाय्यक पोलीस अधीक्षक तुमसर, नितीन चिंचोळकर पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन तुमसर, विजयसिंग गोमलाडू पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन तुमसर व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष नितीन धांडे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सचिव प्रा. अमोल उमरकर, कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, अंकुश गभने, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, प्रज्वल बुद्धे, नितीन सार्वे, मनोज बोपचे, अंकित तुमसरे, अंकित इटणकर, युवनेश धांडे, नितिन दमाहे, तुषार बागडे, मयूर पुडके, प्रवीण धांडे, साहिल धार्मिक, संकेत बूधे, भूषण पड़ोले, दिपाली मते, शर्वरी नखाते, वैष्णवी मेश्राम, तसेच देव्हाडी येथील शीवस्वराज्य ग्रुप चे सर्व मावळे व इतर यांच्या परिश्रमातून प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *