तुमसरात ७ एप्रिल ला राष्ट्रीयस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा; एसएनएस स्कूल च्या स्टेडियमवर आयोजन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : लगतच्या शिरिनबाई नेतरवाला स्कूल मानेकनगर माडगी येथेल शाळेत राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन कोर्ट, लिनिंग मॅट सोबत एक सराव कोर्ट आणि मल्टी फॅसिलिटी जिम असलेल्या एफ डी एन बॅडमिंटन स्टेडियमचे उद्घाटन व तीन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन स्पधेर्चे भव्य आयोजन दि ७ एप्रिल रोजी करण्यात आले असून आता पर्यंत १० राज्यातील विविध गटातील खेळाडूनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असल्याची माहिती एसएनएस स्कूल चे प्राचार्य पी बिमल यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिरिनबाई नेतरवाला स्कूल च्या प्राचार्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, शाळेत निर्माण करण्यात आलेला एफडीएन बॅडमिंटन स्टेडियम व जिम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अभ्यासक्रमाचा एक भाग आहे.

या शाळेने शिक्षणाबरोबरच क्रिडा एकात्मिक शिक्षणावर तसेच फिटनेसचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. या ठिकाणी स्पोर्ट्स हब आणि कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याच्या कल्पनेला जन्म दिला. शाळा १७+ क्रिडा सुविधा पुरवत आहे, ज्यामध्ये इन्डोर बॅडमिंटन कोर्ट (३ कोर्ट ) जिम (चार पावर गेम्सची सोय आहे) आर्म रेसलिंग, पॉवर लिμिटंग, बॉडी बिल्डिीग आणि स्ट्रेथ लिμिटंग, फुटबॉल मैदान, बास्केटबाल कोर्ट, व्ही. सी. ए. मान्यता प्राप्त क्रिकेट मैदान, अ‍ॅथलेटिक्स मैदान (ट्रॅक आणि फिल्ड), टेनिस (क्ले कोर्ट), व्हालीबॉल, खो-खो, कबड्डी, टेबल टेनिस, कॅरम आणि बुध्दिबळ यांचा समावेश आहे, लवकरच शाळा आपल्या अभ्यासक्रमात कौशल्य विषयांचा समावेश करण्याच्या मार्गावर आहेत.

तर होणाºया स्पर्धेबाबद माहिती देताना सांगितले की, बाहेर राज्यातून येणाºया खेळाडू ची तुमसर रोड रेल्वे स्थानक तसेच बस स्थानक येथून ने-आण करण्याची तसेच त्यांच्या भोजनासह निवासाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून आता पर्यंत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आसाम, बिहार, प बंगाल, कर्नाटक, दिल्ली येथील खेळाडूंनी आपले नाव खेळांसाठी नोंदणी केली आहे. अजूनही ईतर राज्यातून खेळाडू येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. प्रथमत: तुमसर सारख्या छोट्याशा शहरात राष्ट्रीय स्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन हे बॅडमिंटनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. तरूणांना प्रो खेळाडूंशी स्पर्धा करण्याची आणि खेळाची अनुभूती घेण्याची तसेच खेळामध्ये ओळख मिळवण्यासाठी समर्पितपणे आणि निष्ठेने काम करण्याची इच्छा नेतरवाला ग्रुपची आहे. सदर स्पर्धा संचालक अनोश नेतरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार असून आयोजन समितीमध्ये आश्रयदाते अनोश नेतरवाला, एफ. डी. नेतरवाला, श्रीमती परवीन मेहता आणि श्रीमती लैला मेहता यांच्या समावेश असल्याची माहिती प्राचार्य बिमल यांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.