राज्य स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत तुमसरच्या अंबरीश देवढे ला सुवर्ण पदक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : येथील सेंट जान स्कुल तुमसर येथील शिकत असलेला अंबरीश जितेंद्र देवढे याने नुकताच भद्रावती येथे राजनंदन लॉन मंगल कार्यालय येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत सहभागी होऊन १७ वषार्खालील ६३ ते ६९ या वयोगटातील झालेल्या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करीत सुवर्ण पदक पटकावले. अंबरीश देवढे याची निवड महाराष्ट्र च्या बॉक्सिंग टिम मध्ये करण्यात आली. सदर निवडीच श्रेय अंबरीशने आपले आई बाबा व प्रशिक्षक सागर जगताप सर यांना दिले आहे. तर अंबरीशच्यानिवडीबद्दल अनेक चाहत्यांनी अंबरीशचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *