मांडळचे कुस्तीपटू आल इंडिया कुस्ती स्पर्धेत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील मांडळ गावच्या तरुणांनी युथ गेम कुस्ती स्पर्धा भंडारा येथे महाराष्ट्र सिनीयर टीम मध्ये सहभाग नोंदवला. भंडारा जिल्ह्यातील शिवाजी व्यायाम शाळा मांढळ गावातील पैलवानांनी अव्वलस्थान कुमार गटातून ४५ किलो वजन गटात प्रथम प्रणय बारस्कर तसेच १९ वर्ष खालील ५७ किलो वजन गटात प्रथम अभिषेक चौधरी तर सिनीयर गटात ५७ किलो वजन गटात प्रथम मयुर चौधरी आणि ६१ किलो वजन गटात प्रथम अतुल चौधरी यांनी प्रथम स्थान प्राप्त केले. दिल्ली येथे होत असलेल्या आॅल इंडिया कुस्ती स्पर्धेत कुमार आणि १९ वर्षा खालील आणि सिनीअर कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कडून या स्पर्धकांची निवड झाली आहे. सुरेंद्र वहिले, लक्ष्मीकांत शेलोकर, सरपंच ज्योती पंचबुदे यांनी कुस्तीपटूंचे अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.