गोबरवाही येथील नागझीरा मंदिरात महाशिवरात्री यात्रा

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : येथील रेल्वेस्थानकाजवळील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री. नागझीरा मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले असून येथे येणाºया भक्तांसाठी योग्य सोयीसुविधा केल्या आहेत. तुमसर तालुक्यातील तसेच कटंगी जिल्हा शिवनी आंतरराज्यीय महामार्गावरील गोबरवाही रेल्वेस्थानका जवळील सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेले श्री नागझीरा तीर्थक्षेत्र ५०० वर्षे जुने आहे. गुरुनानक स्मृती ट्रस्ट, नागपूरचे तत्कालीन सचिव जमशेदसिंह कपूर यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार, १५१४ मध्ये गुरुनानक देव यांनी देश दौºयाच्या दुसºया टप्प्यात दक्षिण भारताचा प्रवास सुरू केला होता. जबलपूर, शिवनी मार्गे गोबरवाही येथे आले. तेव्हा त्यांचा शिष्य मर्दाना नेहमी प्रमाणे त्यांच्या सोबत होता.

परिसरात मोठे जंगल होते, त्यावेळी गावात पाण्याचे भीषण संकट होते. त्राही-त्राही माजली होती. घनदाट जंगलात कवडू भील नावाच्या आदिवासी वाघा सोबत भटकताना दिसला. तो वाघ कवडू पाटील घराण्यात चिमट्याची नियमित पूजा केली जाते. गोबरवाहीचा नानकझिरा आणि चंद्रपूरचे नानक पठार प्रसिद्ध आहेत. शीख धर्माच्या धर्मग्रंथातही याचा उल्लेख आहे. पाण्याच्या टाकीत मोठ्या संख्येने साप राहू लागले. त्यामुळे कालांतराने नागझिरा हे नाव प्रचलित झाले. वर्ष १९७० पासून या जागेच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले. आज तेथे शिवमंदिर, नाग मंदिर, साईबाबा मंदिर आहे. हिंदू धर्मातील पुराणांमध्ये नागदेवतेची पूजा करून तपश्चर्या केल्याने पुत्रप्राप्ती होते असा उल्लेख आहे. जलकुंडाचे पाणी पवित्र असून ते भाविक तिर्थ म्हणून नेतात.

वर्षभर येथे भाविकांची ये-जा सुरू असली तरी महाशिवरात्री, नागपंचमी, मकरसंक्रांती, रक्षाबंधन आदी सणांमध्ये येथे लोक मोठ्या संख्येने येतात. दिलेले नवस, वचन पूर्ण करून वर्षभर येथे सातत्याने महाप्रसादाचे आयोजन होतात. येथे येण्यासाठी प्रवासी पैसेंजर ट्रेन, बसेस, खाजगी वाहने, आॅटो रिक्षा इत्यादी सर्व वाहतुकीची साधने उपलब्ध असल्याने हे तीर्थक्षेत्र सर्वांसाठी सोयीचे आहे. भीलचा पाळीव वाघ होता. दोघे ही पाण्याचा शोध घेत होते आणि पाण्याच्या शोधात भटकत होते.

वाघा ने गुरुनानक देव आणि त्यांच्या साथीदाराला पाहताच त्यांच्या दिशेने धाव घेतली, कवडू ला वाटले कि वाघ त्याना आपले शिकार बनवेल, पण वाघ गुरुनानकजींच्या जवळ पोहोचताच तो गुरुनानकजींच्या चरणी लोटु लागला, हे दृश्य पाहून कवडू भील यांना वाटले की ते कोणीतरी संत आहेत. कवडू भील यांनी त्यांना जलसंकटाची माहिती दिली. त्यानंतर गुरू नानक देव यांनी डोंगराकडे पाहिले आणि डोंगराच्या पायथ्याशी चिमटा मारला आणि पाण्याच्या प्रवाहात गंगा प्रकट झाली. त्या संताच्या स्मरणार्थ गांवकºयांनी लोखंडी चिमटे बनविला, आज ही गोबरवाही गावातील अवथरे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *