जि.प हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथे शिक्षकांचा वाणवा

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : मागील पाच सहा वर्षापासून गोबरवाही नजिकच्या नाकाडोंगरी येथील जिल्हा परीषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे पाचवी ते आठवीपर्यंत हिन्दी, मराठी, इंग्रजी व गणित या विषयाचे ४ शिक्षकांच्या जागा रिक्त तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ वी आणि १२ वी वर्गासाठी मराठी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे विषय शिकवण्यासाठी ४ शिक्षकांची कमतरता असून शिक्षकाविना येथील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असून त्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. करीता लवकरात लवकर या शाळेत रिक्त शिक्षकांच्या जागा भराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सौरभ डहरवाल यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. नाकाडोंगरी गाव हे या ग्रामीण भागाचे मुख्य केंद्र आहे.

त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा परिषदेचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सन १९५५ पासून वर्षानुवर्षे येथे सुरू आहे. मात्र गेल्या ५, ६ वर्षांपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित विषयाचे ४ शिक्षक कमी आहेत. त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ११ वी आणि १२ वी वर्गासाठी मराठी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र हे विषय शिकवण्यासाठी ४ शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आज जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्यासाठी जिल्हा शासन व जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रयत्नशील आहेत, ही बाब स्वागतार्ह आहे.

खासगी शिक्षण संस्थांबाबत सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला आहे. सर्वसामान्य जनता आशेने जिल्हा परिषद व शासनाकडे पाहत आहे. मात्र नाकाडोंगरी येथील जिल्हा परीषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षकांच्या रिक्त जागा असल्यामुळे येथील पाचवी ते आठवीसाठी ४ शिक्ष्- ाक तसेच ११ ते १२ वी वर्गासाठी लागणारे ४ शिक्षकांच्या जागा तात्काळ भराव्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सौरभ डहरवाल यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. जिल्हा परिषद व जिल्हा परिषद, पंचायत समिती करिता निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला द्यावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *