शासकीय जागेवरील अतिक्रमण काढले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील वडेगाव येथे मागील दहा वर्षांपासून शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यातंर्गत आज, २० सप्टेंबर रोजी तिरोडाच्या तहसीलदारांनी पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढले. वडेगाव येथील रोशन सहसराम बडगे यांनी थे २००२-०३ मध्ये ७७५ स्केअर फुट शासकीय जागेवर अतिक्रमन करून पक्के घर तयार केले होते. ग्रामपंचायतने ते अतिक्रमन हटवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १५८ चे कलम ५३ नुसार ११ सप्टेंबर रोजी रोशन बडगे यांना इमारत सोडण्याचा व अतिक्रमण काढण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, आज,२० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसिलदारांनी पोलिस बंदोबस्तात शासकीय जागेवरील बडगे यांनी केलेले अतिक्रमण पाडले. ही कारवाई नायब तहसीलदार सी. डी. पुंडक, मंडळ अधिकारी पी. एस. कुंभरे, तलाठी एस. के पवार, ग्रामविकास अधिकारी जयंत तिडके यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *