चोरीच्या दुचाकी विकणारी टोळी जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दुचाकी चोरी करुन बनावटी कागदपत्राच्या आधारे विक्री करणाºया दुचाकी ३ चोरट्यांना २० डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, चौकशीत दुचाकी चोरीचे १० गुन्हे उघडकीस आले. शहरात मागील काही महिन्यात दुचाकी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार शहर पोलिसांद्वारे विशेष मोहिम राबवित आहे. यातंर्गत दुचाकी चोरी गुन्ह्यासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी श्रीकांत उर्फ शशांक अरुण बोरकर (१९)रा. पाऊलदौना, नाशिक उर्फ अज्जू हिरालाल राणे (२०) रा. पाऊलदौना व आशिष जितेंद्र बागडे (१९) रा. चिचगावटोला यांना ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे कबूल केले. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहिती आधारे ११ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या २४ दुचाकी जप्त केल्या. यात आमगाव पोलिस हद्दीतून ३ दुचाकी, देवरी ५, सालेकसा ४, गोरेगाव २, डूग्गीपार १, गोंदिया शहर ५ तसेच बालाघाट जिल्ह्यातील पोलिस हद्दीतून ४ अश्याएकूण २४ दुचाकी चोरी केल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिस तपासात आरोपींनी केलेल्या १० गुन्हे उघडकीस आले आहेत. यात गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील ५ गुन्हे, आमगाव १, सालेकसा २, डुग्गीपार १ व देवरी पोलिस ठाण्यातील १ गुन्ह्याचा समावेश आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोनि चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सागर पाटील, सैदाणे, पोहवा जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, अरविंद चौधरी, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, ओमेश्वर मेश्राम, सुबोध बिसेन, पुरुषोत्तम देशमुख, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार, मुकेश रावते, विकास वेदक, रहांगडाले, दीक्षित दमाहे, प्रभाकर पालांदूरकर, रीना चव्हाण यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *