बत्तीस गोवंशाची सुटका

भंडारा पत्रिका/ गोंदिया : देवरी ते चिचगड मार्गावरील नवेगावबांध टी-पाईंट येथे चिचगड चिचगड पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नाकाबंदीदरम्यान कत्तलखान्याकडे अवैधरित्या गोवंशांना नेणाºया कंटेनरवर कारवाई केली. या कारवाईत कंटेनर व ३२ गोवंश जनावरे ताब्यात घेण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चिचगड-देवरी मार्गाने कत्तलखान्याकडे अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती चिचगड पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवेगावबांध टीपाईंट येथे नाकाबंदी केली.

दरम्यान अशोक लेलँड कंपनीचा टीसी १२, यूबी ६०३३ क्रमांकाच्या कंटेनरची पाहणी केली असता आतमध्ये ३२ गोवंश जातीचे जनावरे कोणतेही प्रकारची हालचाल न करता निर्दयतेने कोंबलेल्या स्थितीत दिसून आली. याप्रकरणी ९ लाख किमतीचा कंटेनर व १ लाख ६० हजार रुपयांचे गोवंश असा १० लाख ६० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. याप्रकरणी जाहीर गलीब बेग (३०, मुतीर्जापूर) व मोहम्मद रिजवान मोहम्मद मुस्तफा (४३, वंदेवीनगर, नागपूर) यांना अटक केली आहे. ही कारवाई ठाणेदार शरद पाटील, पोहवा ब्रिजलाल मरसकोल्हे, नापोशि कमलेश शहारे, अमित मेंढे, पोशि संदीप तांदळे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *