बलात्कार प्रकरणी, २३ वर्षाचा सश्रम कारावास

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : स्वत:च्या अल्पवयीन भाचीवर बलात्कार करणाºया आरोपीला जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने १३ डिसेंबर रोजी २३ वर्षाचा सश्रम कारावास व २२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. अशोक ॠषी मेंढे (४० रा.पिंपळगाव, ता.अर्जुनी मोरगाव) असे आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी सप्टेंबर २०१९ मध्ये आपल्या मावशीच्या गावी गेली होती. दरम्यान, घरी कोणतीही नसताना मावशीचा पती अशोक मेंढे याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास मावशीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही आरोपीने मावशीला ठार मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला.

पीडित मुलगी घरी आल्यावर काही महिन्याने तिच्या घरच्यांना ती गर्भवती असल्याचे लक्षात आले. त्यांनी चौकशी केली असता तिच्यासोबत घडलेला प्रकार वडीलांना सांगितले. वडीलांच्या तक्रारीवरुन अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. खटल्यादरम्यान, विशेष सरकारी वकील कृष्ण पारधी यांनी न्यायालयासमोर १३ साक्षीदार व बचाव पक्षाच्या २ साक्षदारांची उलट तपासणी केली. दरम्यान जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यावर व साक्षपुराव्याच्या आधारे अशोक मेंढे दोषी आढळल्याने २३ वर्ष सश्रम कारावास व २२ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंडाची रक्कम पीडितेला सानुग्रह भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. याप्रकरणी पैरवी कर्मचारी म्हणून पोलिस हवालदार क्रिष्णाकुमार अंबुले यांनी काम पाहिले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *