करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या मारेकºयांना फाशीची शिक्षा द्या!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : राजस्थानी राज्यातील जयपुरे शहर येथे राजपुत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांची गोळया झाडुन हत्या करण्यात आली असुन सदर आरोपींना फाशी ची शिक्ष देण्यात यावी अशी मागणी राजपुत क्षत्रीय ठाकुर समाज संघटनेच्या वतीने तुमसर उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत देशाचे गृहमंत्री यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.

जयपुर येथे दि.५ डिसेंबर २०२३ रोजी राजपुत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांना त्यांच्या राहत्या घरी दोन व्यक्तींनी गोळया झाडुन हत्या केली.त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व या हत्येचा कट रचणाºयांचा शोध घेवुन त्यांनासुध्दा फाशीची शिक्षा देण्यात यावी, सुखदेवसिंह गोगामेडी यांना गृहमंत्रालयाने सुरक्षा दिली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती करीता त्यांच्या कुटूंबियांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आहे. या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास क्षत्रीय राजपुत संघटनेतर्पेष्ठ आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतांना राजपुत क्षत्रीय, ठाकुर समाज संघटनाचे अध्यख महेताबसिंग ठाकुर, उपाध्यक्ष विकाससिंह परिहार, दिपेंद्रसिंह क्षत्रीय, मुकेशसिंह ठाकुर, करनी सेना युवा अध्यख हर्षद ठाकुर, मोनु ठाकुर, सुदीप ठाकुर, शिवांग सिंग,रवि ठाकुर, सुधीर ठाकुर, शिवपालसिंग ठाकुर आदि उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *