सार्वजनिक हनुमान मंदिर तुमसर येथे प्राणप्रतिष्ठा

Cartoon Hanuman Stock Photos - Free & Royalty-Free Stock Photos from Dreamstime

तुमसर : स्थानिक माकडे नगर, तुमसर येथील रामजी गणेशा शाळेच्या प्रांगणात असलेला हनुमान मंदिरात नव्याने श्री गणेश, श्री साईबाबा, शिवपिंड व नंदीची प्राणप्रतिष्ठा दि.०३ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार ला पं. श्रीकांतजी जोशी, पं. वखारे गुरुजी नागपूर व सहकारी यांच्या शुभहस्ते पार पाडले. प्राणप्रतिष्ठेपूर्वी सर्व देवांची शोभायात्रा तुमसर भ्रमणकरिता सकाळी १० वाजता निघाली. प्राणप्रतिष्ठा सकाळी ९ वाजता सुरू होऊन ४ वाजता आटोपली. सायंकाळी श्री महावीर भजन मंडळ तुमसर द्वारे मंदिरात सुंदरकांड करण्यात आले. दि. ४ फेब्रुवारी २०२३ शनिवारला सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत प्रा. शांतारामजी ढोले महाराज नागपूर व सहकारी द्वारे संगीतमय किर्तन व दही हांडी फोडण्यात आली. सायंकाळी ७ वाजेपासून भजन झाले व भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. माकडे, शास्त्री, गुरुनानक, जगनाळे व रामकृष्ण नगर व पूर्ण तुमसर शहरातील जवळपास ५००० लोकांनी सर्व देवांचे दर्शन घेऊन महाप्रसादाच्या आस्वाद घेतला. प्राणप्रतिष्ठा सहित सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन इंजि. सुनील घनश्याम लांजेवार, माजी सभापती न.प. तुमसर व सौ शोभाताई सुनील लांजेवार, माजी नगरसेविका न.प. तुमसर यांनी सार्वजनिक नवदुर्गा उत्सव समिती माकडे नगरचे पदाधिकारी व कार्यकर्ता शेरू बुराडे, श्रीकांत धुर्वे, मुकेश सहारे, राजू गौरे, भाऊराव धुर्वे, सुनील बुराडे, जीतू आंबिलडूके, निलेश काटकर, लिलाधर जांगळे, सुरेश समरीत, पवन पाटील, गंगाधर कावळे, समीर पवार, अर्पित खानोरकर, अक्षय बाणासुरे, आशिष दार्वेकर, गुलशन धुर्वे, रॉकी जायस्वाल, गणेश पवार, मनोज चकोले, राकेश चारमोडे, गणेश धुर्वे, महेश राऊत, अजय नवखरे, शैलेश धुर्वे, राहुल कुलरकर, महेंद्र समरीत, अनुकूल बालपांडे, सरोज चकोले, सचिन चकोले, गीता कोंडेवार,नूतन भोले, कुंदा वैद्य, करुणा धूर्वे, लीला देशमुख, उर्मिला राजगिरे, शोभा सहारे, गिता लांजेवार, अश्र्विनी बिसणे, छाया वंजारी, अश्विनी निखाडे इत्यादींना सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *