गोंदियातील नळ योजनांचे भाग्य उजळणार

गोंदिया : वीज बचतीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील तब्बल ९०० पाणीपुरवठा योजनांवर सौरऊर्जा बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. सौरऊर्जेद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. सौरऊर्जा उभारणीमुळे वीजपुरवठा खंडित होऊनही नागरिकांना वेळेवर पाणी मिळू शकेल. तर वीज बिलांपासूनही जिपच्या पाणी पुरवठा विभागाची बचत होईल. प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या शासनाचा हेतु आहे. याच उद्देशाने शासनाने जल जीवन मिशन योजना सुरू केली आहे. योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, अनेक पाणीपुरवठा योजना वीजेवर चालवल्या जात आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाला दरमहा लाखो रुपयांची वीजबिल भरावी लागतात.वीजबिल वेळेवर न भरल्यास वीज पुर- वठा खंडीत केला जातो. यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. परिणामी त्यांना विहिरी, बोअरवेलचे दूषित पाणी वापरावे लागते. पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक योजना बंद पडल्या आहेत.

ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषद प्रश- ासनाने सौरऊर्जा उपकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेमुळे वीज बिलांमध्ये तब्बल ८ कोटींची बचतहोणार आहे. जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार २२२ योजना राबविण्यात येणार आहे. त्यापैकी ९०० योजनांवर ३३ किलो वॅट सौरऊजेर्ची उपकरणे बसवण्याचे कामही सुरू झाल्याचे माहिती आहे. योजनोचे वीजबिल वेळेवर न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाता. यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन वीज बिलात बचत व्हावी आणि नागरिकांना वेळेवर पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने पाणीपुरवठा स्रोतांवर सौरऊर्जा उपकरणे बसविण्यात येत आहेत. १२२२ योजनांपैकी ९०० योजनांवर सौर ऊर्जा उपकरणे बसविण्याचे उद्दिष्ट असून कामेही सुरू झाली आहेत. यामुळे वीज बिलात तब्बल ८ कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे जिपच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभााचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *