अनिष्ट प्रवृत्तीना दूर घालवण्यासाठी भावजागरण!

आज गुरुवार दि.२३ नोव्हेंबर २०२३ कार्तिक एकादशी लहान-मोठे म्हातारे सर्वच व्यक्ती साजरी करत असतात किंवा या दिवशी उपवास धरत असतात. असा उपास करणाºयांमध्ये दोन भेद आहेत. एक समर्थ भागवत त्यासाठी दोन प्रकारच्या एकादशा मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे वारकरी लोक भागवत एकादशी तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमी, एकादशी, द्वादशी असेल किंवा द्वादशीचे वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुदा स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादश्या स्वतंत्र दिवशी येतात. तर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात. तेव्हा त्या एकादशीचे नियम वेगळे असतात. वर्षभरात चोवीस एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील दोन महाएकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात.

या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठूरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर दुसºया दिवसापासून राज्यभर तुळशी विवाहाला प्रारंभ होतो. कार्तिकी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. राज्यभरातून वारकरी मंडळी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं येत असतात. आज कार्तिकी एकादशी आहे. वारकºयांना दर्शनमिळावे म्हणून २४ तास विठ्ठर मंदिर सुरू ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते. त्याचप्रमाणे हजारो वारकरी मजल-दरमजल करत कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या ओढीने पंढरपुरात दाखल होत असतात. पंढरपुरात पोहचल्यावर कळसाचे दर्शन, मुखदर्शन जे जे शक्य होईल तशा पद्धतीने विठ्ठलाचे दर्शन घेत असतात. त्याचबरोबर या दिवशी चंद्रभागा नदीत स्नान करायला देखील महत्व असल्याचे मानले जाते. त्यामुळे चंद्रभागेचा किनारा वारकºयांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. या चार्तुमासाला भागवत धर्मात, वारकºयांमध्ये, हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते,तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. कर्क संक्रांत आषाढ मासात येते. त्यामुळे आषाढ शुद्ध एकादशी अर्थात आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते.

या दिवशी देव झोपी जातात,अशी वारकºयांची श्रद्धा आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोप घेऊन जागृत होतात. त्यामुळे म्हणून तिला ‘प्रबोधिनी एकादशी’असे म्हटले जाते. नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो. त्यामुळेचार्तुमासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो,अशी समजूत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौणिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचा श्री कृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळशी विवाह केल्यास कन्यादानाचे पुण्य मिळते व मोक्ष प्राप्ती होते. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार महत्व आहे.श्रीविष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असेही संबोधले जाते. तुळशीशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ ठरते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेंव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले. त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असे मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चार्तुमासात जी व्रते केली जातात त्याचे उद्यापन करतात. विठ्ठला विष्णूचे रूप मानले जाते. त्यामुळेच कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात तुळशीचा विवाह पार पडतो. राज्यभरातून वारकरी मंडळी या दिवशी पंढरपूला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. तर ज्यांना पंढरपूला जाणे शक्य नाही ते एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाला नमस्कार करता. यावेळी देवाला तुळशीपत्र वाहिले जाते. अभंग, कीर्तनासारखे कार्यक्रम आयोजित करून विठूरायाचा जयघोष केला जातो. यामहिन्यात हवामान पावसाळी पाऊस जास्त पडतो.

आषाढी एकादशी शायनी किंवा व कार्तिकी एकादशीस प्रबोधनी असे म्हटले जाते. कार्तिकी शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशीचे श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आहे. तुळसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते व त्यामागे मोक्ष सुद्धा प्राप्ती होते. असे भारतीय संस्कृतीत तसेही भारतीय संस्कृतीत तुळशीला खूप महत्त्व आहे. श्री विष्णूला तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रियाअसेही म्हटले जाते. तुळशी वाचून केलेली कृष्णाची पूजा व्यर्थ ठरते. पद्मपुराणात असे म्हटले जाते की, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले. तेव्हा त्याचा एक थेंब जमिनीवर पडल्यामुळे तुळशी या वनस्पतीचा जन्म झाला असेही मानले जाते. तुळशी विवाह झाल्यानंतर चार्तुमासात जी व्रत केली असतील,त्या व्रताची सुद्धा उद्यापन करतात. कार्तिक शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच दिवस नऊ पंथीय एक दिवसाचा उपवास करता चर्तुमास वर्षाचा शेवटचा दिवस मानला जातो. याशिवाय एकादशी लाज प्रबोधनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चार महिन्याचा चर्तुमास संपल्यानंतर श्री विष्णु भगवान योग निद्रेतून जागे होतात असे मानले जाते. त्यामुळे देवस्थानी किंवा देवउठणी एकादशी असेही कार्तिकी एकादशीला म्हटले जाते. या दिवशी पंढरीचे विठुराया यांचे स्मरण सुद्धा केले जाते. त्यांच्या नावाने उपवास सुद्धा धरल्याचा तो वर्षांमध्ये एकूण चोवीस एकादशी असतात. या विषयीची एक कथाही आहे. भारत हा देशात वारकरी संप्रदायाचेवेगवेगळे संप्रदाय आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायातील लोक कार्तिकी एकादशी हे व्रत साजरे करत असते. व त्यामध्ये सर्वसाधारण शेतकरी वर्ग सुद्धा येतो.

म्हणून जे आपल्या नशीबाला येतं त्याला देवाने दिलेला प्रसाद म्हणून ग्रहण करावा.दु:ख असेल तर दु:ख, सुख असेल तर सुख म्हणून पंढरीच्या विठ्ठलाला साकळ घातले जाते. तसेच सुखा दुखात आपला विठ्ठल आपल्या सोबत आहे असेही म्हटले जाते. एकादशी हे विठ्ठल रुक्माई यांच्यासाठी संसारातील दु:ख जाऊ दे व सुख येऊ दे म्हणून सांसारिक महत्त्व जास्त आहे. असे संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत नामदेव या संतांनी आपल्या शेतात किंवा आपल्या कामातच शोधला म्हणून आपल्या कामामध्ये शोधा अशी त्यामागचे आपल्याला महत्त्व दिसून येते. पंधरा दिवसातून एक एकादशी येत असते. म्हणून पंधरा दिवसातुन आपल्या इंद्रीयांना आराम मिळण्यासाठी हा उपवास ठेवणे गरजेचे असते. म्हणून एकादशीचा उपवास ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. १४ दिवसांचा आहाराचा जो रस बनतो,त्याची उपवासाने अजून रूपांतर होत असल्याने एकादशीच्या उपवासाला महत्त्व आहे. गृहस्थाश्रम यांनी केवळ शुक्ल पक्षातील एकादशीचे उपवास करावा.

चार्तुमासात मात्र दोन्ही पक्षातील एकादशीचे व्रत असे शास्त्र सांगते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते,म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते. त्या दिवशी देव झोपी जातात. अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देऊन झोप घेऊन जागृत होतात,म्हणून तिला प्रबोधनी एकादशी असे म्हणतात. नवा सृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य सुरू असताना पालन कर्ता श्रीहरी विष्णू निष्क्रिय असतो. म्हणूनच चार्तुमासात विष्णू शयन म्हटले जाते. तेव्हा श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतो,अशी मान्यता असल्याचे म्हटले जाते. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू नंतर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर म्हणजे द्वादशीला विष्णू प्रभू उत्सव साजरा केला जातो. एकादशी या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाला नमस्कार करताना, तुळशीपत्र वाहतात. कधीकधी द्वादशी जर दोन आल्या असेल तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात. एकादशा जर दोन असतील तर भागवत आणि स्मार्ट असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात. एकादशी व्रत बरेचजण ठेवत असतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर एकादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. एकादशीचा काळ संपल्यानंतरच उपवास सोडतात हा काळ पंचांगात दिलेला असतो. कार्तिकी एकादशी बद्दल एक कथा आहे. ती म्हणजे मृदुमान्य राक्षस आणि भगवान शंकरांची भक्तिपूर्वक आराधना केली,त्याचा भक्तिभाव पाहून महादेवांनी प्रसन्न होऊन त्या राक्षसाला वर दिला तू कोणाकडूनही मारणार नाहीस. पण एका रात्रीत एका स्त्रीच्या हातून मारशील,असा वर मिळताच त्या राक्षसाचा मृदुपणा नष्ट झाला. त्याने प्रथम देवाचा पराभव केला परंतु शंकरानेच त्याला हा वर दिल्यामुळे कोणाचेही काहीच चालले नाही. सर्व देव व भगवान शंकर एका गुहेत लपलेली त्यांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी होते.

तिने मृदुमान्य याला ठार मारले. तेव्हा भरपूर पाऊस पडला त्यामुळे देवाची आंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे उपवासही झालाच त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी सकाळी लवकर उठून नदीवर किंवा घरी आंघोळ करून आपल्या कुलदैवताची तसेच विष्णू पूजा करून तुळशीपत्र वाहतात. अशाप्रकारे एकादशी माहात्म्य वाचल्याने आपले पाप नष्ट होते, असे म्हटले जाते. थोडक्यात या एकादशीला धर्मजागरण करून अनिष्ट प्रवृत्तीना दूर घालवण्यासाठी भावजागरण केले पाहिजे. जेणेकरून समाजात सतप्रवृत्ती व सतभावनांचा प्रभाव निर्माण होईल व त्यातून प्रेरणा घेऊन पुरुषार्थी पुरुष पुढे येतील. प्रबोधन या शब्दाच्या व प्रबोधिनी या व्रताच्या अर्थ त्यामुळे एकप्रकारे सार्थकी लागेल. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने कार्तिक शुद्ध एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.