भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार!

बौ द्धधर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे,याचाच अर्थ ‘मोक्ष’असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्धधर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्धसंकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. आज बुधवार ६ डिसेंबर २०२३ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. हा दिवस आंबेडकरी अनुयायांनी शांततेने आणि गांभीयार्ने पाळावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस व्यक्तिमत्त्व आजही आपणा सर्व भारतीयांना सदैव स्फूर्ती देणारे व दिशादर्शक तसेच प्रेरणादायी आहे. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लोकशाहीप्रणीत भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेवर कधीही न फिटणारे उपकार केले आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक व इतर विविध क्षेत्रात अतुलनीय मौलिक कार्य करून त्यांनी आपले खरे राष्ट्रप्रेम दाखवून दिले. जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धांची गरज आहे,असे विश्वशांतीचे विधान करणाºया विद्वानाला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने विद्यापीठ स्थापनेच्या तीनशे वर्षातील ‘सर्वात हुशार विद्यार्थी’ म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घोषित करून विद्यापीठासमोर त्यांचा पुतळा उभारला.

‘ज्ञानाचे प्रतीक’ असा त्यांचा गौरव केला. त्यामुळे भारत देशासह विदेशातही चारित्र्यसंपन्न आणि नि:स्वार्थी लोकसेवेमुळे एक आदर्श व प्रेरणादायी व्यक्ती म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे भारतमातेचे एक महान सुपुत्र होय. अस्पृश्य समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबात १४ एप्रिल १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या. डॉ.आंबेडकर यांच्या ‘ळँी ढ१ङ्मु’ीे ङ्मा ३ँी फ४स्रीी झ्रक३२ ङ्म१्रॅ्रल्ल ंल्ल ्रि३२ २ङ्म’४३्रङ्मल्ल’ पुस्तकाच्या आधारावर ‘रिझर्व बँक आॅफ इंडिया’ची पायाभरणी झाली.तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ.आंबेडकरांनी स्वत: अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’, असा संदेश त्यांनी जनतेला दिला. अस्पृश्यतेचे चटके आणि अवहेलना यांना सामोरे जात पराकाष्ठेची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी अखंड ज्ञानसाधना केली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० च्या दशकामध्ये भारताच्या सामाजिक-राजकीय पटलावर पदार्पण केले आणि पुढील चार दशके, म्हणजेच ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान दिले. विद्वत्तेचे ते प्रकांड पंडित होते. अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, पत्रकार, संसदपटू, समाजसुधारक, राजकीय मुत्सद्दी आणि बौद्ध धम्मचक्र अनुप्रवर्तक अशा भूमिकांमधून त्यांनी भारताच्या इतिहासावर आपला आगळा वेगळा ठसा उमटवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५७ रोजी त्यांचे दिल्लीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो.या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेविका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात.

दरवर्षी येणाºया श्रद्धावानअनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ.आंबेडकरांचे अनुयायीविचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे. इ.स.२००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती’ ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१ वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी वर्षानुवर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. निधनापूर्वी आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्यांच्यासोबत त्यांचे सुमारे ५ लाख अनुयायीही बौद्ध धर्मात सहभागी झाले होते. त्यांना लोक ‘बोधिसत्व’ मानतात. डॉ.आंबेडकर हे बौद्ध गुरू होते. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतातून लक्षावधी लोक येतात व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या डॉ.आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मूर्ती समोर ठेवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौध्द विहारे, घरात,सार्वजनिक स्थळी, शाळा महाविद्यालये, शासकीय कार्यालये इ.ठिकाणी महापरिनिर्वाण दिन या दिवशी डॉ.आंबेडकरांना अभिवादन करतात. त्यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते. त्यांचे गुरू भगवान बुद्धाइतकेच प्रभावी आणि सद्गुरु होते असे त्यांचे अनुयायी मानतात. डॉ.आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळेच निर्वाण मिळाले असे ते मानतात. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून मानली जाते. महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दश: अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती अव्याहतपणे जपण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अखंडपणे तेवणारी भीम ज्योत उभारण्यात आली आहे.

यासाठी मुंबई महापालिकेला साडेएकवीस लाख रुपये खर्च आला. ११ सप्टेंबर २०१९ रोजी या भीमज्योतीचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. ही भीमज्योत सव्वा आठ फूट उंच आणि साडेसात फूट रुंद आहे. तेवणाºया ज्योतीचा भाग बिडाच्या धातूपासून बनवण्यात आला आहे. आठ मिलीमीटर काचेच्या आवरणाआड ही ज्योत सतत तेवत राहते.या ज्योतीला महानगर गॅसतर्फे २४ तास अखंड गॅस पुरवठा केला जातो. गौतम बुद्धांचा, ‘अत्त दीप भव’ म्हणजेच स्वयंप्रकाशित व्हा हा प्रेरणादायी संदेश वेगळ्या अर्थाने अनुयायांना देण्यासाठी ही भीमज्योत उभारण्यात आली आहे. राज्य सरकारने अखंड प्रज्वलित राहणारी देशातील पहिली भीमज्योत मुंबईतल्या ओव्हल मैदान परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्यासमोर बसवली होती. दुसरी अखंड भीमज्योत ही दादर येथील चैत्यभूमी परिसरातील आहे. भेटी देणारे उल्लेखनीय व्यक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ आॅक्टोबर २०१६ रोजी चैत्यभूमीस भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. मोदी हे या स्मारकास भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९७८ मध्ये चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते. मागील चौदावर्षांपूर्वी अर्थात २००९ मध्ये आपल्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील भंडारा रोड रेल्वे स्टेशनवरून विदर्भ एक्सप्रेसने मुबंई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाण्याचा योग आला होता.

मोहाडी येथील राजेंद्रनगरातील रहिवासी व सुप्रसिद्ध जागृत माँ चोंडेस्वरी देवी मंदीर कमिटीचे माजी अध्यक्ष प्रेमरतन दमानी यांच्या चाळीतील इलेक्ट्रॉनिक दुकानदार स्व.आनंद निमकर यांचे दुकान होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मोहाडी येथील टिळक वार्डातील रहिवासी विषय शिक्षक पुनाजी बारई, वासुदेव चोपकर, शरद नंदरधने, स्व.गणेश पाटील, स्व.क्रिष्णा तुकाराम निमजे, सिराज नझीर शेख, संजय वासुदेव मोटघरे, रायभान तरारे यांच्यासोबत मुबंई येथील चैत्यभूमीत अभिवादन करिता गेलो होतो. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो येतात. अत्यंत आदराने चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्तीसमोर अभिवादन करतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वत:च्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ.या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात. सामुदायिक वंदना म्हणण्याची प्रथा सुरू करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे, त्यागाचे स्मरण करावे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विन्रम अभिवादन.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.