प्रसिद्धीच्या झोतात असलेला मोहाडीचा”कान्होबा”

श्रावण हा महिना विविध धार्मिक सणांनी नटलेला. या महिन्यात आनंद उत्साहाला नुसते उधाण आलेले असते. जिकडे तिकडे प्रफुल्लीत वातावरणात साम्राज्य धो-धो कोसळण्याचा पावसाच्या कालावधी संपून पावसाळ्याच्या मध्यकाल आलेला असतो. रेशमधारा पाऊस सुरू होतो. ऊन पावसाचा असा लपंडाव चालेला असतो. ती प्रसन्नचित्त असते ते दर्शविण्यासाठीच की काय ती हिरवेगार शालू घातलेली असते. या हिरवळीवर हरणे निर्भयपणे चरत असतात, कुरणातून पुष्ट झालेली गाय-वासरे बाळगतात, पक्षी वृक्षावर बसून गात असतात आणि त्या गाण्यात नद्यानाले, झरे इत्यादी आपले सुर मिसळीत असतात.लता-वेली फुलांनी बहरून जातात. अशा आनंदाने भरलेला श्रावण महिना असतो. त्यात माणसेही आपला आनंद प्रसन्न चित्ताने मनमुराद ओतीत करतात. ते आपला आनंद जल्लोष अनेक धार्मिक सण महोत्सव साजरा करीत असतात.

म्हणून श्रावण महिन्यात सण फार आहेत. त्या सर्व सणात महत्त्वाचा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात भंडारा जिल्ह्यात प्रसिद्धीच्या झोतात असलेला मोहाडीचा’कान्होबा’सण होय. श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशीच वासुदेव आणि देवकीच्या पोटी श्री भगवान गोपालकृष्णाने जन्म घेतलेला हा महान दिवस म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमी होय. वासुदेव व देवकी यांच्या आनंद काय वर्णन करावा ते सांगणे कठिणच. प्रत्यक्षच ईश्वरच या भुतलावावर अवतरले. जिकडे तिकडे प्रसन्नतेचे वातावरण मथुरावासी आनंद सागरात डुवून गेले अशा भगवान श्रीकृष्णाचा सोहळा साजरा केला जातो. गोकुळ-मथुरा-द्वारका-जगन्नाथपुरी या ठिकाणी तर या सणाचा महोत्सवाच्या कळस गाठलेला असतो. जेथे जेथे हिंदूची मंदिरे आहेत. त्या-त्या ठिकाणी हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.म्हटले तर घावगं ठरणार नाही. मराठी माणसे तर मुळातच उत्सवप्रिय ज्या आतुरतेने आपण गणपती बाप्पा मोरयाची वाट पाहतो त्याच उत्साहाने मोहाडीवासी श्रीकृष्ण जन्माष्टमीला अर्थात कान्होबाला भरगच्च १ कोटी ८० लाखांची खरेदी केली जाते.

कुठल्याही सणाचा आनंद लुटताना त्या दिवसाचा संबंध देवा-देवीकींशी लावतो. गेली कित्येक वर्ष मोहाडीवासी कान्होबावासी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर असलेले मोहाडी हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे.या ठिकाणी मोहाडी माँ चौण्डेश्वरी देवीचे जागृत देवस्थान आहे. मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान असलेले जिमेदार बाबा मंदिर आहे. भंडारा जिल्हा मोठ्या प्रमाणात हलबा कोष्टी समाजातील बहुसंख्य नागरिक प्रतिक्षेतही जगण्याची अपेक्षा बाळगून आहे. भंडारा-मोहाडीआंधळगाव-सिहोरा-मुंढरी-सानगडी-पालांदूर-किटाळीअड्याळ-पवनी यामध्ये हलबा कोष्टीची बºयापैकी लोकसंख्या आहे.विणकरी हा त्यांचा व्यवसा आहे. मांगठ्यावर लुगडे आणि धोतर तयार करण्यासाठी कांडे भरण्यापासून तर पांजन करणे- विणणे अशी किती श्रम पडतात.

याचा विचार न केलेला बरा. परंतु,अनेक गावातील मांगठ्याची खटखट बंद पडली आहे. आठवड्यातून दोनदा लागणाºया त्यांच्या बाजारपेठा इतिहास जमा झाल्या असल्या तरीही विणकरी व्यवसायाची दैनावस्था पाहत आहे. विणकरांची दुर्दशा झाली असली तरी या समाजाने जोपासलेला श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात कान्होबा सणाला आजही तोड नाही. मोहाडीचा’कान्होबा’ म्हणून येथे या सणाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. मोहाडी नगरपंचायतची लोकसंख्या १० हजार ५८० आहे. या गावात ५० टक्केच्यावर हलबा बांधव समाजातील आहेत. आज अनेक विणकर कुटुंबातील मोठमोठ्या हुद्द्यावर भारताच्या कानाकोपºयात आजही कार्यरत आहेत. गावात इतरही समाजाचे लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. परंतु,विणकरांचा कान्होबा सण काही वेगळाच आहे.कान्होबा हा शब्द तसा पुढे टोपण नाव म्हणून वापरला जाऊ लागला. मोहाडी विणकर समाजातील अनेकजन टोपणनावानेच ओळखले जातात. टिनोपान, मिठ्ठखाया, ओळगीझड्यया, उंदिर, पुनाकोडोल, हांडीधºया, बगळ्यावाला, फणीवांच्या, उचीदडी, मैनीवाला, म्हशावाल्या, जदोतंबाखूवाला, टाकळीवाला, फळ्यावाल, बघ्यावाला, चिमणीखाया, सिहोरावाला, चिकणी जगन, नागठाणावाला, सातघºया, भंडारावाला,विहिरवाला, तीनबायकावाला, खोपडीवाला, पोंगावाला, चुटीकाट्या, बोधीवाला, मिरचीखाया, हांड्यावाला, मुंढरीवाला, नाम्यबघ्यावाला, कुकश्यावाला, पचहात्या,घुगरीखाया, कुकडाखाया, पाटबळी, गुपचुप, कुत्तरवाला, गाठीबांध्या, टोकर, किश्यापैका, खवूळचटण्या, गुबीहुंग्या, बदरीवाले असे कितीतरी टोपणनाव आहेत. लोक आणि नातेवाईक सारेच या टोपण नावानेच ओळखतात.

मोहाडीत येऊन विचारा वासुदेव निखारे कुणीही सांगणार नाही. मात्र,टिनोपाल म्हटले की कोष्टी समाजातील लहान मुलगा असो की मुलगी असो कुणीही सांगेल. परंतु,आता ही नावे अस्तीत्वासारखीच नष्ट होत आहेत. विणकर समाजातील कित्येकजण शेतीच्या कामावर जातात. विणकर समाजातील नोकरी व्यवसाय करणारे दिवाळीत येणार नाहीत. लग्नाला क्वचितच येतात. मात्र,श्रीकृष्ण जन्माष्टमी अर्थात कान्होबाला हमखास भारताच्या कानाकोपºयातून मोहाडीला येतात. यानिमित्ताने सर्वांच्या भेटी होतात. विणकर व इतर समाजातील भावीक श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आंघोळ करून घराच्या बाहेर पडतात स्वयंसिद्ध श्रीराम मंदिर परिसरात कुंभाराची घरे आहेत. सध्या वेळेअभावी लोकसंख्या १० हजार ५८० च्या मानाने कान्होबा म्हणजे मातीचे मुर्ती असलेली श्रीकृष्णाची मुतीर्ची तयारी सुरू असते. किमान १५१ रुपयापासून १ हजार ५०१ रुपयापर्यंत कान्होबा मातीच्या

मुर्तीची किंमत असल्याचे मुतीर्कार मनोज गोपीचंद कोटांगले यांनी सांगितले. आपल्या पसंतीच्या कान्होबाची मुर्ती तयार म्हणजे रंगीत करायला सांगतात. दुपारी १२ वाजेपर्यंत आपल्या स्वत:च्या घरी स्थापना करतात. सोबतीला २० रुपयाची चणेवाली ढिवरीन अर्थात मातीची मुर्ती घेतात पुजा चौरंग पाटावर कान्होबाला बसवितात आजूबाजूचा परिसर रंगीतमय कागदे व तोरणे पताकालाऊन सजविले जातात. त्या दिवशी महिला व मुली भगवान श्रीकृष्णाच्या नावाने उपवास पकडतात.त्या दिवशी सामुहिक कान्होबाची रात्री ९ वाजताच्या सुमारास पुजा साधना करण्यात येते. आपल्या मनाप्रमाणे घरोघरी भजन किर्तन होते तर काही ठिकाणी डायका रात्रभर वाजविल्या जातात. रात्री बारा वाजताच्या सुमारास श्रीकृष्णाचा पाळणा आपोआप हलतो अशी त्यांची श्रद्धासाधना आहे. खरंच कान्होबाच्यावर जो फुलोरा बांधला जातो तेथूनच रात्रीच्या सुमारास आपोआपच करंजी अथवा काही तरी वस्तू खाली म्हणजे चौरंग पाटावर पडते हे विशेष आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी दुसºया दिवशी नऊ वाजताच्या सुमारास आंघोळ करून दुधाचा नारळ फोडून श्रीकृष्ण मुर्तीची साधना करून पुजा करतात.या दिवशी गोडधोड आणि वषार्तून एकदाच केल्या जाणाºया चकल्या कान्होबाला प्रसिद्ध असलेली करंजी अवश्य करतात दुपारी उपवास सोडतात.

मोहाडीतील सर्व दुकाने किराणा व्यापारी संघाच्या वतीने दुपारी तीन वाजताच्या सुमारास कान्होबा विसर्जनाच्या निमित्ताने स्वयंस्फूर्तीने बंद करून उत्सवात सहभागी होतात. दुपारी चार वाजताच्या सुमारास बहुउद्देशिय परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवनाजवळून भजनाच्या निनादात विणकर समाजातील महिला तर इतर समाजातील लोक चौरंग पाटासोबत डोक्यावर कान्होबा पकडतात यावेळी संपूर्ण परिवारासह विसर्जनाला निघतात. नवनवीन कपडे परिधान करून मुली या निमित्त्या घरच्या बाहेर ऐश्वर्या रॉय आणि माधुरी दिक्षीत असल्याप्रमाणे नटून थटून विसर्जनाला सहभागी होतात. कान्होबाच्या आठवड्याआधी नारळाच्या कवठ्या किंवा भांड्यामध्ये गव्हाचे दाणे पेरले जातात. त्यातून भूजली तयार होते. या भुजलीचे मोहाडीत कान्होबाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसºया दिवशी विद्यार्थी युवक बालकृष्ण उत्सव मंडळ गांधीचौक,मोहाडीच्या वतीने जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयासमोर आणि गांधी पुतळ्यासमोर दहिहांडी बांधून हा सण मोठ्या आनंदात साजरा करितात. प्रो.कबड्डीपटू आकाश नत्थु पिकलमुंडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील मानेवाडातील अंकित मस्के यांच्या डीजे साउंड आणि विद्दुत लाईटिंगच्या गोविंदा रे गोविंदा…तालात मुले-मुली नृत्य करितात. सदर कार्यक्रम महाप्रसाद वाटप करून करण्यात येते. मोहाडी येथे विणकर व इतर समाजातील लोक भुजली एकमेकांना देतात. ढोलकी-टाळ-गजर साºया गावात ऐकूण येतो. टोपण नाव असलेल्या गटागटातील कान्होबा डोक्यावर घेऊन श्रीक्षेत्र गायमुख नदीच्या तिरावर विसर्जन करण्याकरिता नेण्यात येते. काही लोकांचे नदीकाठही ठरले असतात. सर्वात जास्त जागृत माँ चौण्डेश्वरी देवी मंदिराच्या समोरून वाहत जाणारी श्रीक्षेत्र गायमुख नदीवर सर्वाधिक कान्होबाचे विसर्जन करतात. याचे कारण असे आहे की,मोहाडीवासीयांचे आराध्य दैवत असल्याने कान्होबा विसर्जन झाल्यानंतर माँ चौण्डेश्वरी देवीच्या मंदिरात भुजली चढवितात. या निमित्ताने नारायण स्वामी पादुका मंदिर-भगवान शंकर भोलेनाथ-शिडीचे साईबाबाशेगावचे गजानन महाराज-श्री गणेश मुर्ती-वडाचे व उमराचे वृक्षांना विविध देवीदेवतांना भुजली चढवितात. म्हणून मंदिराकडल्या नदीकडे विसर्जन सर्वाधित होते. मंगलमय वातावरणात प्रभूचे नामस्मरण साºयाच रस्त्यावर कानी पडते. नदीपात्रात पुजाआरती मुर्ती विसर्जीत करून पाट व भुजली तेवढी घेतात आणि मग होतो रात्री नऊ वाजेपर्यंत भुजली वाटण्याचा कार्यक्रम सुरू असतो.यावर्षी लग्न झालेले नवदाम्पत्य आपल्या जोडीने थोर-मोठे लहान मुलेमुली सर्वच गावातीलआप्तस्वकीयांच्या घरी जाऊन भुजली देतात. या निमित्ताने स्थानिक शाळेतील विद्यार्थी तर विद्यार्थिनी जिन्स पॅन्ट टी-शर्ट घालून एकमेकांच्या घरी जाऊन मोठ्या आवडीने भुजली देतात एक प्रकारचा नुकताच झालेला मैत्री दिवस अर्थात फ्रेंडशिप डे साजरा होत असल्याचा आनंद द्विगुणीत केला जातो.

स्नेह वाढविण्यासाठी ही प्रथा आजही अस्तित्वात आधुनिक युगात परंपरागत अविरतपणे सुरू आहे. मोहाडीचा कान्होबा या सणावर काही कुंभार अवलंबून आहेत. बहुतेक विणकर समाजातील आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र, कान्होबा तर करणारच आपण कधी आलेच तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसºया दिवशी म्हणजे गुरूवार दि.७ सप्टेंबर २०२३ ला दुपारी चार वाजताच्या सुमारास मोहाडीवायींना कान्होबा श्रीक्षेत्रगायमुख नदीच्या तिरावर पाहण्यासारखा असतो. याचे वैशिष्ट्य मोहाडी माँ चौण्डेश्वरी देवीच्या मंदिरासमोर अवघे पंढरपुर असल्याप्रमाणे संपूर्ण गावातील हजारोंच्या संख्येने मोठ्या श्रद्धेने कान्होबाचे विसर्जन करतात. मोहाडी येथील एखादा विणकर समाजातील भारताच्या कानाकोपºयात व्यक्तींनी फोनवर किंवा भ्रमणध्वनीवर विचारा तर तु मोहाडी कब आवस तर तो म्हणतो. मी आंब कान्होबालाच आऊ, असे म्हणतो. ग्रामीण विदर्भातील सर्वाधिक खपाचे मराठी दैनिक भंडारा पत्रिकाच्या वतीने हॅपी कान्होबा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.