मतदार यादी अधिक सुदृढ होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून या प्रक्रियेत कोणीही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी भारत निवडणुक आयोगाचे निदेर्शानुसार व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील जिल्हा निवडणूक अधिकारी आपले स्तरावर प्रयत्न करत आहेत. मात्र राजकीय पक्षांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच शासनाच्या मतदार नोंदणी अभियानात सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत मतदार यादी निरिक्षक विभागीय तथा आयुक्त,नागपूर विभाग श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी मतदार यादी निरीक्षणा अंतर्गत प्रथम भेटी च्या अनुषंगाने व्ही. सी द्वारे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची व जिल्हा निवडणूक अधिकारी यांची बैठक घेतली. परिषद कक्ष सभागृहात झालेल्या या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती बिदरी यांनी १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विधानसभा मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सांगितला. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण ,मतदान केंद्र निहाय बीएलए नियुक्ती, जिल्ह्यातील मतदारांची नोंदणी सद्यास्थिती याबाबत चर्चा करून, मतदार नोंदणी सह स्थलांतर, मृत मतदारांची नावे वगळणी , नव मतदार नोंदणी या संदर्भात राजकिय पक्षांनी देखिल सक्रिय सहभाग घेण्याची विनंती केली.दिनांक ०९/१२/२३ अखेर मतदार नोंदणी ,वगळणी व दुरुस्ती बाबत अर्ज करण्यासाठी मतदारांना अवगत करण्याचे त्यांनी उपस्थित राजकीय पक्ष प्रतिनिधींना आवाहन केले.प्रारूप यादी मध्ये आपले नाव तपासुन ०९ डिसेंबर पर्यंत अर्ज करणेबाबत विशेषत: नव मतदार नोंदणी बाबत कार्यवाही करणे संदर्भात त्यांनी सुचना दिल्या. राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाचे केंद्रस्तरीय प्रतिनिधी (इछअ) नियुक्त करून त्यांच्या माध्यमातून मतदार यादी अधिक सुदृढ करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. विभागीय आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. तसेच भंडारा जिल्ह्यातील उपस्थित मतदार नोंदणी अधिकारी यांचा आढावा घेऊन त्यांना मतदार नोंदणी बाबत सुचना दिल्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.पिसाळ यांनी भंडारा जिल्ह्यातील मतदार नोंदणी बाबतच्या कामकाजाचे सादरीकरण केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *