दहा वर्षापासुन तलाठी कार्यालयाचे घरभाडे थकीत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनी तालुक्यातील ३१ तलाठी कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीत चालविल्या जात आहे.मात्र मागील १० वर्षापासुन या कार्यालयाचे तब्बल १ कोटी ६ लाख ९३ हजार भाडे थकीत असल्याने घरमालकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त केला जात आहे.एका महिन्यात शासनाने आम्हाला आमचे घरभाडे द्यावे अन्यथा पवनी तालुक्यातील संपुर्ण तलाठी कार्यालयाला एकाच दिवशी,एकाच वेळी ताला ठोकण्याचा इशारा घरमालकांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतुन दिला आहे. पवनी तालुक्याअंतर्गत ७ मंडळात ४१ तलाठी कार्यालये कार्यरत आहेत. त्यापैकी ३१ तलाठी कार्यालये हे भाड्याच्या खोलीत आहेत. २०१३ पुर्वी या कार्यालयाचे मासिक भाडे हे फक्त १२५ रुपये होते मात्र २०१३ नंतर शासनाने मासिक भाड्यात वाढ करून एक हजार रुपए केले.त्यातही तलाठी कार्यालयाचे विद्युत बिल हे घरमालकालाच भरायचे आहे. मात्र मागील दहा वर्षापासुन शासनाने तलाठी कार्यालयाचे भाडे न दिल्याने घरमालकांमध्ये शासना विषयी रोष व्यक्त केल्या जात आहे.या संदर्भात घरमालकांनी तहसलदार पवनी यांची भेट घेवुन तलाठी कार्यालयाच्या थकीत घरभाड्याची मागणी केली असता महसूल विभागाकडे सध्या निधी उपलब्ध नसुन निधी उपलब्ध झाल्यावर घरभाडे देण्यात येईल असे बोलुन घरमालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रकार परिषदेतुन करण्यात आला .

विशेष म्हणजे तलाठी कार्यालयाचे कोणतेही भाडे करारनामा नसल्याने नेमके कोणत्या तलाठी कार्यालयाचे किती भाडे शिल्लक आहे याची कोणतीही आकडेवारी शासनाकडे नाही त्यामुळे घरमालकांना न्याय मागणीसाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. करीता शासनाने याची गंभीर दखल घेत पवनी तालुक्यातील तलाठी कार्यालयाचे थकीत घरभाडे एका महिन्यात अदा करावे अन्यथा सर्व ३१ तलाठी कार्यालयाला ताला ठोकु असा इशारा पत्रकार परिषदेतुन प्रशासनाला देण्यात आला. पत्रकार परिषदेला भाजपा भंडारापवनी विधानसभा प्रभारी अनुप ढोके यांच्यासह घरमालक नरेंद्र आयतुलवार, देवराव मेश्राम, डॉ.हरडे, बंडु धरमशहारे, देवानंद पंचभाई,रमेश खोब्रागडे,अनिल जिभकाटे, मनोज भोेंगाडे,शेवंताबाई तलमले, ज्ञानेश्वर पारधी, अशोक कुर्झेकर उमाजी देशमुख,सुधाकर काटेखाये, यांच्यासह इतरही पिडीत घरमालक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *