तुमसरात विकास फाऊंडेशन भूमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात समस्या दूर होईना त्यामुळे शेतकºयांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विकास फाउंडेशनच्या वतीने दि.९ फेब्रु. रोजी तुमसर तहसिल कार्यालयावर भूमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्चा काढण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, शेतीसाठी लोड शेडिंग बंद करून ८ तास वरून १२ तास वीज उपलब्ध कर- ावे, पी एम किसान योजनेचे योग्य लाभार्थ्यांना पैसे वसुलीचे दिलेले नोटीसची कार्यवाही थांबविण्यात यावी, खाजगी, शासकीय- -निमशासकीय कामांना ५०० रुपयांत प्रति ब्रास रेती शासनाने उपलब्ध करावी, माती-मुरूम रॉयल्टी माफ करून मंडळ अधिकारी यांनापरवानगीचे अधिकार द्यावे, गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना पुन: सुरू करावी, तलाव, नाला,बोडी, जंगलातील नाला,तलाव खोलीकरण करून शेतीसाठी सदर गाळ विनामूल्य देण्याची अधिसूचना प्रकाशित करावी, तुमसर नगर परिषदेने वाढविलेला स्वच्छता कर माफकरावे,ग्रामीण भागातील घरकुल प्रमुख मागण्यांसाठी तुमसर तहसिल शेतमजूर आणि बेरोजगार योजनेला २.५० लाख रुपये निधी द्यावी, शेतकºयांचे वीज बिल माफ करावे या कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. तरुणांच्या हाताला काम द्यावे. अशा अनेक समस्या बाबत आज तुमसरतहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास विकास फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिला. यावेळी विकास फाउंडेशन कार्याध्यक्ष डॉ. युवराज जमाईवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले , सभापती राजेश सेलोकर, सभापती नंदू रहांगडाले, उपसभापती हिरालाल नागपुरे, उपसभापती बबलू मलेवार, जि प. सदस्य उमेश पाटील, जिल्हा प. सदस्य धुरपताबाई मेहर, डॉ. शांताराम चाफले, डॉ.गोविंद कोडवानी मुख्य प्रवक्ते, शहर अध्यक्ष मेहताबसिंग ठाकूर, राजेश पटले, तालुका अध्यक्ष तुमसर परमानंद कटरे, तालुका अध्यक्ष मोहाडी हंसराज आगाशे, पं.स. सदस्य राजेश ठाकूर, विवेक रहांगडाले, सलोनी भोंडे, सुशीला पटले, पल्लवी कटरे, निशा उईके, विश्मा सेलोकर, जगदीश शेंडे,कैलाश झंझाड, दुर्गा बुराडे, छायाताई तडस, कौतिका मंडलेकर, नगरपंचायत मोहाडीचे सदस्य यादोराव कुंभारे, माजी उपाध्यक्ष नप, कांचन ताई कोडवानी, अनिल जिभकाटे, हरिचंद्र बंधाटे, चंदू पिलारे माजी जिल्हा परिषद सदस्य, ललित शुक्ला तसेच मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *