लाभार्थ्यांना जॉब कार्ड वाटप व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय टवेपार पं.स. येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत, गट विकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, सरपंच, तसेच सर्व ग्रा. प सदस्य यांच्या हस्ते लाभार्थ्यांना जॉब कार्ड वाटप करण्यात आले. सेवा पंधरवडा व आंतर राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त “दादाजी ज्येष्ठ नागरिक गृह” येथे आरोग्य तपासणी व उपचार शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी एकूण २० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०२२ या कालावधीत “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित करुन नागरिकांच्या नागरिकांच्या अजार्ला गति मिळत आहे. या कार्यक्रमातम लाखनी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यालय जसे, महसूलविभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, नगर विकास विभाग, महिला व बालविकास कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग महावितरण विभाग, पोलीस विभाग, हे सहभागी झाले. या शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी संदीप कदम, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *