अवैध रेती वाहतूक प्रकरणी 1 कोटी 73 लक्ष 35 हजाराचा मुद्देमाल जप्त,17 टिप्पर जप्त

भंडारा /प्रतिनिधी पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याचा दर्शविलेला इशारा खरा ठरतो आहे. मागील काही दिवसात अट्टल गुन्हेगारापासून ते अवैध व्यवसायईकांच्या मुसक्या आवळण्याचे काम निरंतर सुरू आहे. त्याच साखळीत लाखनी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 17 टिप्पर वर कारवाई करत एकून 1 कोटी 73 लक्ष 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा पोलिसांची इतिहासातील ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. सदर कारवाईमुळे गौण खनिज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की , पवनी पो स्टे मध्ये हवालदार पदावर कार्यरत सत्याराव महादेव हेमने ब.न. 219 हे दि. 07/01/2023 चे 20.00 वा. ते दिनांक 08/01/2023 चे 08. 100 वा पावेतो रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना दिनांक 08/01/2023 चे पोस्टे स्टे डा. साना कमांक 01/2023 वेळ 00.03 वाजता पोस्टे हददीत गस्त कामी पोशि सावकरकर ब.न.997 चालक नापोशि कुर्सेकर ब.न. 1178 सह शासकिय वाहनाने पोस्टे परिसरात जाण्यास रवाना झाले. कन्हाळगाव बीट कार्यक्षेत्रामध्ये रात्रगस्त करित असताना खातखेडा गावाकडून सावरला गावाकडे जाणा-या रोडावर वन्यजीव प्राणी हरण हे मृतावस्थेत रोडावर पडलेले दिसल्याने त्याबाबत वेळीच वनविभागाशी संपर्क साधून वनविभागाचे कर्मचा-याना माहिती देण्यात आली. देण्यात आलेल्या माहितीवर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी हजर आल्याने त्यांनी आम्हा समक्ष रोडावर मृतावस्थेत असलेले हरण बाजुला करून कार्यवाही करण्यास सुरूवात केल्याने आम्ही वेळीच त्यांना योग्य त्या सुचना देऊन रात्रगस्त कामी रवाना झालो. रात्रगस्त दरम्यान निलज ते भिवापूर रोडवर रात्रगस्त करित असताना शांतता दिसुन आल्याने नियंत्रण कक्ष भंडारा यांनी आमचे लोकेशन बाबत विचारपूस केली असता नियंत्रण कक्ष भंडारा यांना लोकेशन देवुन रात्रगस्त कामावर रवाना झालो .
त्यादरम्यान नियंत्रण कक्ष भंडारा यांनी अंदाजे 04.45 ते 05.00 वा. दरम्यान पोस्टेला बिनतारी संदेश प्रसारित केली की, निलज ते भिवापूर रोडवर मा. पोलीस अधिक्षक साहेब भंडारा यांचे आदेशाने सपोनि निलेश गोसावी पोस्टे लाखणी व त्यांचे सोबत असलेले स्टाफने अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टिप्पर यांना पकडून ठेवले असुन त्यांना मदतीची गरज असुन आपण तात्काळ पोस्टेचा स्टाफ घेवुन सदर घटनास्थळी पोहचा असे सांगितल्यावरून सदरची माहिती आम्ही पोनि गढरी साहेब यांना देवुन आम्ही पोनि गढरी, सपोनि राऊत, पोउपनि हरगुडे, पोहवा बिसने ब.न. 662, पोशि सावरकर ब.न.997, चालक पोना कुझेंकर ब.न. 1178, चालक पोशि हाके ब.न.542 सह निलज ते भिवापूर रोडवर गेला असता मूर नदीचे पुलाच्या अलिकडे अंदाजे 500 मीटर अंतरावर रेतीने भरलेले ट्रक दिसुन आले. आम्ही सर्व सपोनि निलेश गोसावी यांना भेटून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, एकूण 17 टिप्पर हे अवैधरित्या रेती वाहतूक करताना मिळून आले आहे परंतु टिप्पर चालक हे पळून गेले असे कळविले व त्या दरम्यान रोडने येणारी जाणारी वाहतूक प्रभावित झाल्याने त्यास सुरळीत करून घटना ठिकाणी अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले एकूण 17 टिप्पर यांची पंचासमक्ष पाहणी केली असता खालील नमूद वर्णनाचे व क्रमांकाचे टिप्पर………
01 MH-40 AK-5710 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000रू 02) MH-40-BL-2683 कि.अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि.15,000 रू 03) MH-40-BG-3968 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000 रू 04) MH-49-AT-9197 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 06 ब्रास कि.30,000 रू (05) MH-40 AK-7197 कि.अं.10,00,000 रू रेती अंदाजे 05 ब्रास कि. 25,000रू (06) MH-40-BL-4656 कि.अं.10,00,000 रू रेती अंदाजे 04 ब्रास कि. 20,000 रू 07) MH-40 AK-4342 कि.अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000 रू 08) MH-40-BL-1921 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000 रू. 09) MH-40-BG-8216 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000 रू 10) MH-40-AK-5272 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि. 15,000 रू 11) MH-40-AK-3995 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 06 ब्रास कि.30,000 रू 12) MH-40-Y-8433 कि. 13) MH-40 CD-8952 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 06 ब्रास कि.30,000 रू 14) MH-40-BG-8988 कि. अं. 10,00,000 रू रेती अंदाजे 03 ब्रास कि.15,000रू 15) MH-40-BG-0575 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 05 ब्रास कि.25,000 रू 16) MH-40-AK-7445 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 04 ब्रास कि. 20,000 रु 17 ) MH-40-GD-8475 कि. अं.10,00,000 रू रेती अंदाजे 04 ब्रास कि. 20,000 रु
असा एकूण 01,73,35,000 /- रू ( एक करोड त्र्याहत्तर लक्ष पस्तीस हजार रू ) वरिल नमूद कमांकाचे टिप्पर दोन प्रतिष्ठीत पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करून घटनास्थळ पंचनामा कार्यवाही करण्यात आली. बाहेरील टिप्पर चालक यांना बोलावुन त्यांची मदत घेवून सदर 17 टिप्पर हे पवनी येथील पंचभाई वे ब्रीज वर आणुन त्यांचे मोजमाप करून सदर टिप्पर सुरक्षेतेच्या दृष्टिने पवनी येथे बस आगारा मध्ये लावण्यात आले आहे. लावण्यात आलेल्या टिप्पर संबधात वेळोवेळी मा. पोनि सा. यांनी वरिष्ठांना मोबाईलव्दारे माहिती दिली. तसेच चोरटया स्वरूपात रेतीची वाहतूक करणारे टिप्परचे चालक मालक यांचे वर कार्यवाही करण्याकरिता थांबवुन ठेवलेले सपोनि निलेश गोसावी यांना सुध्दा माहिती देण्यात आली. कार्यवाही करीता आणलेले टिप्पर पैकी 11 टिप्पर मालक यांनी अन्य इसमाचे हस्ते रेती वाहतुकीचे रॉयल्टी पोस्टेला आणुन सादर केली सादर केलेली रॉयल्टी ही शासन गृहित आहेत किंवा नाही ? याची शहानिशा करण्याकरिता मा.तालुका दंडाधिकारी श्रीमती निलीमा रंगारी मॅडम तहसिल कार्यालय पवनी यांना सुध्दा मा. पोनि साहेब यांनी माहिती दिली. तालुका दंडाधिकारी यांनी सुध्दा आपली चमू बस आगार पवनी येथे पाठविली त्यांनी सुध्दा टिप्पर चालकाजवळ मिळून आलेली रॉयल्टी ही शासन गृहित आहे किंवा नाही ? याबाबत शहानिशा करण्यास सुरूवात केली आहे मिळून आलेल्या टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात रेतीची वाहतूक करीत असतांनी मिळून आल्याने त्याबाबत मा. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परिवहन विभाग भंडारा यांना पत्र व्यवहार करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे..
वर नमूद टिप्पर चालक / मालक यांनी शासनाचा महसुल बुडवुन अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांचे विरूध्द कलम 379,34 भा.द.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यास आला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *