किल्ले सहानगड उर्फ सानगडी स्वच्छता मोहीम

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान साकोली व भंडारा विभागाचा स्तुत्ये उपक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, साकोली व भंडारा विभाग तर्फे भुईकोट किल्ले सहानगड, सानगडी येथे रविवार दि. ८ जानेवारी २०२३ रोजी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भंडारा शहराच्या पुर्वेला असलेल्या साकोली तालुक्यापासून १७ कि.मी. अंतरावर सानगडी हे गाव आहे. सहानगड या लहानशा किल्ल्यावरूनच या गावाला सानगडी हे नाव पडले आहे. गावाबाहेरील उंच टेकडीवर नागपूरचे रघूजी राजे भोसले यांनी १७३४ मध्ये हा किल्ला बांधला. किल्ल्याचा दरवाजा आजही सुस्थितीत असून दरवाज्याच्या आतील भागास पाहरेकºयांसाठी देवडया असून येथील एका देवडीच्या आतील बाजुस कोठार आहे. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे कोरी व काम अथवा शिल्प दिसून येत नाही. देखरेख नसल्याने किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. पडक्या तटबंदी मधून गडावर प्रवेश होतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर दीड एकर परिसरात पसरला आहे. मध्यभागी असलेल्या या बुरुजावरून संपूर्ण किल्ला व दूरवरचा परिसर दृष्टीस पडतो.

दुर्गसंवर्धन कार्यात असं योगदान असावं की सोबतच्या सहकाºयालाही आपला हेवा वाटावा, कार्य असं असावं की गडकोटांचा चिरा न चिरा लावण्यासाठी आपलं आयुष्य कामी यावं, आपलं ते दुर्गसंवर्धन कार्य पाहून सोबतच्या जिवलग मित्रानेही अगदी हक्काने म्हणावं, आता तू एकटा नाहीस मी ही आहे तुज्याबरोबर, अश्या ऊर्जा देणाºया मित्रांच्या साथीने आपले दुर्ग हेच आपला अभिमान हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन “सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान” साकोली तालुका, भंडारा विभाग तर्फे किल्ले सहानगड उर्फ सानगडी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत किल्याच्या परिसरातील कचरा, गवत, काटेरी झाडे, प्लास्टिक बॅग, पॉलिथिन, प्लास्टिक पाण्याच्या बॉटल्या, दारूच्या बाटल्या तसेच किल्याच्या माँ तोफेश्वरी व तोफ असलेल्या ठिकाणात साठलेला कचरा झाडून जाडून संपूर्ण परिसराची साफसफाई करण्यात आले. या मोहिमेला उपस्थित सह्याद्री प्रतिष्ठान भंडारा जिल्हा प्रशासक निखिल कुंभलकर, सह्याद्री प्रतिष्ठान साकोली तालुका प्रतिनिधी गणेश खरकाटे, सुरज शिवणकर, शुभम शिवणकर, जयेश खोटेले, पराग खोटेले, सह्याद्री प्रतिष्ठान मोहाडी तालुका प्रतिनिधी प्रणय काळे, श्रीकांत निमकर, उमेश पचघरे, सह्याद्री प्रतिष्ठान सडक-अर्जुनी प्रतिनिधी गौरव लंजे, गिरीश लंजे, शुभम पुस्तोडे, शुभम साठवणे, प्रकाश जांभुळकर तसेच सानगडी ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच चतुर्भुज भानारकर, बनकर, गोटेफोडे व गावातील मान्यवर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच ऐतिहासिक किल्ले, वारसास्थळे आणि त्याचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला अनुभवता यावा या हेतूने सर्वांनी एकत्र येऊन संवर्धनाचे काम करणे आवश्यक आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने यावेळी आवाहन करण्यात आले की, गडकिल्ले व ऐतिहासिक सर्व पर्यटनस्थळी जातांना आपल्यामुळे त्या ठिकाणी कचरा तसेच ऐतिहासिक वास्तूस नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी. या उपक्रमामुळे जिल्ह्यात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *