दिव्यांग शाळांना १०० टक्के अनुदान कधी देणार?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मुंबई येथील पावसाळी अधिवेशन च्या गुरुवारी झालेल्या कारवाईत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधी प्रश्न लावत म्हणाले की शासनाच्या अध्यासदेशाप्रमाणे २०१५ मधे राज्यात दिव्यांग शाळांना मंजूरी तर देण्यात आली परंतु त्यांना १०० टक्के अनुदान देण्यात आले नाही अश्या शाळांना अनुदान कधी देण्यात येईल आणि ज्या शाळा ब ग्रेड मधे आहेत त्यांना अ ग्रेड मधे कधी आणण्यात येईल? सोबतच त्यांनी दिव्यांग शाळेत काम करीत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांच्याही व्यथा मांडून त्यांना वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी सदानासमोर ठेवली. लक्षवेधी प्रश्न ठेवतांना आ. नरेंद्र भोंडेकर म्हणाले की शासन निर्णय प्रमाणे २००२ पूर्वी च्या १५७ दिव्यांग शाळांना २०१५ मधे मंजूरी देण्यात आली, ज्यात १२३ शाळा अ ग्रेड च्या आणि ३४ शाळा ब ग्रेड च्या होत्या. १२३ ला अनुदानपात्र केले परंतु त्यातील काहींना अनुदान दिले, काहींना ५० टक्के दिले तर कित्तेक शाळांना काहीच अनुदान दिले नाही. यातील अ ग्रेड च्या उरलेल्या शाळांना किती दिवसात १०० टक्के अनुदान देण्यात येईल? असा प्रश्न उपस्थित करत आ. भोंडेकर म्हणाले की गेल्या १५ वर्ष पासून या मागणी करीता मी भांडत आहो. ज्या ३४ शाळा ब ग्रेड मधे मंजूर केल्या होत्या त्यांचा अता पत्ता नाही. त्या ३४ शाळांना किती दिवसात अनुदान देणार? सोबतच आ. भोंडेकर यांनी या वेळी दिव्यांग शाळेत काम करीत असलेल्या पहारेकरी, मदतनीस आणि सफाई कर्मचाºयांची व्यथा सदनात मांडताना म्हणाले की दिव्यांग समजून ज्यांना परिवारातील लोक वाºयावर सोडतात त्यांची सेवा हे पहारेकरी, मदतनीस आणि सफाई कर्मचारी करतात. ज्या करीता मानधनाच्या नावावर त्यांना अत्यल्प रुपये दिले जातात ज्यात त्याचा परिवार चालत नाही. त्यांच्या वेदना बघून त्यांना कायम करून वेतनश्रेणी लागू कधी करणार? असा प्रश्न सुद्धा त्यांनी सदनात मांडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *