मनरेगाच्या कामात गैरव्यवहार, सखोल चौकशीची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा -: मंडणगाव येथील मनरेगाच्या कामात खोट्या हजेरी लावून केलेला गैरव्यवहार व शासकीय निधीच्या दुरुपयोगाची चौकशीच्या मागणीसाठी भाकपतर्फे दिनांक ३ आॅगस्टला पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. धरणे आंदोलनाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व दलित अधिकार आंदोलनाचे राज्य सहसचिव कॉम्रेड हिवराज उके यांनी केले. तर ओबीसी जनगणना परिषदेचे समन्वयक व भाकप नेते कॉम्रेड सदानंद इलमे, लालबावटा शेतमजूर युनियनचे तालुका अध्यक्ष कॉ. वाल्मिक नागपुरे, सचिव कॉ. रत्नाकर मारवाडे व कॉम्रेड नानाजी घोनमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. धरणे आंदोलना दरम्यान बिडीओ अनुपस्थित असल्याने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना निवेदन देण्यात आले.

त्यात मंडणगाव तालुका जिल्हा भंडारा येथे मनरेगाच्या कामात खोट्या हजेरी लावून केलेल्या गैरव्यवहाराची व शासकीय निधीच्या दुरुपयोगाची त्वरित चौकशी करण्यात यावी व कामावर असलेल्या मजुरांची शासकीय यंत्रणेने घेतलेल्या फोटो दाखवण्यात याव्यात व कामाच्या ठिकाणी कोणकोणत्या सुख सुविधा पुरविण्यात आल्या त्याची माहिती देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी त्वरित चौकशीचे आदेश देत असल्याचे सांगितले. शिष्टमंडळात कॉम्रेड हिवराज उके कॉम्रेड सदानंद इलमे कामरेड वाल्मीक नागपुरे, कॉम्रेड रत्नाकर मारवाडे, प्रीती चंद्रशेखर बांडेबुचे, मंदा प्रल्हाद गिदमारे, प्रभू पेंढर, सहेशराम घोनमोडे यांचा समावेश होता. आंदोलनात सुमारे ५० – ६० महिला पुरुष सहभागी होते- त्यात प्रामुख्याने शिवशंकर कडव,नानाजी घोनमोडे, गौरीशंकर कडव, इंदू निंबार्ते, गणेश गाढवे, मंजुषा कढव, भाग्यश्री सनवारे, उषा निंबार्ते इत्यादींची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *