सनीज स्प्रिंगडेल शाळेत ‘गोकुळ’ अवतरले!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दि. ४ सप्टेंबर रोजी कृष्णनगरी येथे स्थित सनीज स्प्रिंगडेल शाळेत जणू गोकुळच अवतरले होते. त्याचे कारण होते ‘कृष्णजन्माष्टमी’ सोहळा. यावर्षीही सालाबादा प्रमाणेच स्प्रिंगडेल शाळेत जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लोहित मतांनी यांच्या पत्नी सौ.मंजित मतानी व सत्यम् एजुकेशन सोसायटीच्या कोषाध्यक्षा शुभांगी मेंढे उपस्थित होत्या. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, कृष्णाची पूजा व आरती करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्ले ग्रुप ते के.जी. टू च्या विद्यार्थानी वेगवेगळी नृत्य सादर केली ही सर्व नृत्ये कृष्णलीलांवर आधारित होती तसेच के.जी. २ ची विद्यार्थिनी ओजस्वी काहाळकर, के.जी. १ चा जय निखाडे के. जी २ ची विद्यार्थिनी तेशा पारखेडकर, के.जी. २ ची अन्वी गडेकर व रुद्रेश तिवारी यांनी कृष्णाची माहिती देणारी भाषणे सादर केलीत. प्ले ग्रुप च्या शिक्षिका रानी वंजानी यांनी सुंदरसे गाणे सादर केले. यावेळी प्रमुख पाहुण्या शुभांगी मेंढे यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. सौ.मतानी यांनीसुद्धा आपल्या भाषणातून सर्व बालगोपालांचे मनापासून कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की एकमेकांना मदत करतच पुढे जायचे असते आणि विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे महत्त्व सांगताना त्या म्हणाल्या, चंद्रगुप्ताच्या जीवनात चाणक्य सारखा शिक्षक होता त्यामुळेच चंद्रगुप्त सम्राट बनू शकला.

यानंतर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम होता गोविंदाचा, अनेक गोविंदा हांडी फोडण्यासाठी तयार झाले होते सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेल आणि शेवटी टाळ्यांच्या कडकडात गोपाल कृष्णाने हंडी फोडली व सवार्ना काला वितरीत केला यावेळी मंचावर प्रमुख पाहुण्यांच्यासोबत सौ.मंजित मतानी, प्राचार्या शेफाली पाल, के. जी. प्रमुख कल्पना जांगडे, प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकरही उपस्थित होत्या आणी त्यांनी बालगोपालांसह दहीहंडीचा आनंद लुटला. कार्यक्रमाला सर्व पालकगण मोठ्या संख्येत उत्साहाने उपस्थित होते व कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मंचावर सर्व राधा व कृष्ण रुपातील विद्यार्थ्यांनी दिसत असल्यामुळे प्रत्यक्ष गोकुळातच गेल्याचा भास होत होता. कार्यक्रमाचे संचालन स्वाती राघोर्ते व कल्पना घोडीचोरे यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी कानतोडे यांनी केले. गोपाल काल्याचा प्रसाद सर्वांना वितरीत करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.