आत्महत्येला प्रवृत्त करण्याºया पत्नी आणि प्रियकराविरुद्ध गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : पवनी येथील पद्मा वार्डातील बांधकाम ठेकेदार योगेश लोखंडे याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मृताच्या वडिलांना आणि भावांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपानंतर आणि तक्रारीनंतर आता पोलिसांनी योगेशची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध योगेशला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलिसांनी आज एक प्रसिद्धीपत्रक काढून या प्रकरणातील नव्या नोंदीसंदर्भात माहिती दिली आहे.

पोलिसांच्या मते, मृत योगेशची पत्नी (वय ३४) आणि तिचा प्रियकर विशाल बावनकर (३५, बजरंग वार्ड, पवनी) यांच्यादरम्यान अनैतिक असल्याने योगेशचे त्याच्या पत्नीशी नेहमी खटके उडत असे. या कारणावरून तो नेहमीच चिंताग्रस्त राहत असे. त्याने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची कल्पना वडील सीताराम लोखंडे यांना दिली होती. त्यानंतर त्यांनी योगेशच्या पत्नीला समजावलेही होते. त्यानंतरही तिच्या वर्तनात कसलाही बदल झाला नाही. याच दरम्यान, पत्नीच्या वर्तनामुळे त्रस्त झालेला योगेश २७ फेब्रुवारीला कोणालाही न सांगता घरून निघून गेला. त्यानंतर ७ एप्रिलला त्याचा मृतदेह शहरापासून तीन किलोमीटरवरील इटगावच्या शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.