बसपातर्फे महात्मा फुले व बाबासाहेबांना आदरांजली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बहुजन समाज पार्टी जिल्हा भंडारा तर्फे ६ डिसेंबर (मंगळवार) रोजी दुपारी १२ ते ४ वाजता पर्यंत गांधी चौक भंडारा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ वे परिनिर्वाण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला दिलीप मोटघरे, जय मेश्राम, पाम्बीर्द, प्रशांत रामटेके, रवि गजभिये, के. एल. गजभिये, शंकर भांडारकर, दीपक माने, मोरेश्वर गेडाम, प्रा. बबन नागरले, विक्रांत भवसागर, लता नरुले, पुरुषोत्तम सहारे, उमराव सेलोकर, जगन ऊके, सुनीता गोंडाने, यशवंत वैद्य, अरूणा चहांदे, सलीम खान, मनीषा गजभिये, नेमीचंद बागड़े, अरविंद बंसोड, मनीष राणे, नरेंद्र रामटेके, शुक्रचार्य डोंगरे, कुंजन शेंडे, नागरत्न रंगारी, दिवाकर निमजे, रोहित दहाट व बहुसंख्येने बसपा कार्यकर्ते, अधिकारी व हितचिंतक उपस्थित होते. सर्वप्रथम गांधी चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात विशेष पाहुण्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय योगदानाबद्दल सांगितले. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मूल्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला उद्देश बहुजन समाज पक्षाने सांगितला. त्याचबरोबर पे बॅक टू सोसायटी आणि समाजाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मजबूत करण्याबाबत सखोल चर्चा झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *