मोहाडी येथे पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), भंडारा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, मोहाडी कार्यालयामार्फत दि.२४ मे २०२३ ला पंचायत समिती सभागृह, मोहाडी, जिल्हा भंडारा येथे पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान “हवामान बदल व त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञान” तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख म्हणुन सभापतीरितेश वासनिक उपस्थित होते. शेतकºयांनी वातावरणाच्या बदलानुसार पीक पद्धतीचा अवलंब करा असे आवाहन केले.

तसेच मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मंडळ कृषी अधिकारी विजय रामटेके, विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अपेक्षा बोरकर यांनी संरक्षित शेती त्यामध्ये शेडनेट, पॉलिहाऊस, ठिंबक, तुषार सिंचन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, पर्यावरण पूरक कृषी विभागाच्या विविध योजना, बीजोत्पादन भात शेती बरोबरच, फळबाग लागवड, बीबीएफ लागवड तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमाला चंद्रभान आकरे, जयपाल राऊत, प्रभाकर टेकाळे, ठवकर, खेडीकर उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *