आज मोहाडी येथे नाना पटोले यांची जनसंवाद सभा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : कांग्रेसच्या जनसंवाद यात्रा निमित्त कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे १३ सप्टेंबर रोजी मोहाडी येथे येत असून त्यांची जाहीर सभा येथील गुरुवार बाजार परिसरात सकाळी ११ वाजता होणार आहे. जनसंवाद यात्रा आंधळगाव येथून सकाळी ६ वाजता मोहाडीकडे पायदळ निघणार आहे. नाना पटोले हे सुद्धा पायी चालणार आहेत. मोहाडी येथे पोहचल्यावर खरेदीविक्री संस्थेजवळ त्यांचा भव्य स्वागत करण्यात येणार आहे. ही यात्रा इंदिरा गांधी चौक ते मोहाडी शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्ग क्रमन करीत गुरुवार बाजार येथे पोहचेल व त्यानंतर त्यांची जाहीर सभा होईल. जनसंवाद यात्रेत जास्तीत नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मोहाडी शहर कांग्रेसतर्फे करण्यात आले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *