श्रीकृष्ण जन्मसोहळ्यात विद्यार्थांना बक्षीस वाटप

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मोहाडी : गोविंदा आला रे…आला, विहीप मातृशक्ती बालसंस्कार वर्ग नेहरूनगर भंडारा श्रीकृष्ण जन्माष्टमी व स्थापना दिवस गोकुळाष्टमी.. श्रीकृष्ण जन्मसोहळा भंडारा नगरीत अंबा माता मंदिर येथे बालगोपाल मातृशक्ती व पालक एकूण पन्नास संख्येच्या उपस्थितीत अतिशय उत्साह आणि आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ता विदर्भ प्रांत संयोजिका कांचन ठाकरे व अतिथी म्हणून भंडारा गोंदिया विभाग प्रमुख दिपा नायर उपस्थित होत्या. कांचन ठाकरे ह्यांनी श्रीकृष्ण कुटुंबावर आधारित प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम घेऊन बºयाच प्रश्नांची उत्तरे मुलांकडून मिळालीत. माखनचोर श्रीकृष्ण व दहीहंडी करिता हिंदू संघटनेची गरज आणि ह्याकरिताच विश्व हिंदू परिषद स्थापना तसेच बालगोपालांसाठी संस्कारा करिता आवश्यक असलेली मातृ शक्ती ह्याविषयी थोडक्यात माहिती दिली. राधा, कृष्ण, देवकी, वसुदेव, सुभद्रा, द्रौपदी या अश्या विविध वेशभूषेतील बालक अतिशय आनंदी व सुंदर दिसत होते. आपल्या प्रत्येक पात्राची ओळख आणि त्यावरील भाष्य, म्हणी, गाणे, भजन, नृत्य असे मनमोहक सुंदर सादरीकरणाने उपस्थितांची मन जिंकून घेतली. आणि इतरांना आनंदित करीत स्व:तही आनंदित झाली.

कार्यक्रमातील दहीहंडी, गोपालकाला आणि दिलेल्या घोषणा गोविंदा आला रे आला… गोपालकाला गोड झाला, ज्याचे नशिबी त्याला मिळाला. ह्यामुळे मंदिर परिसर दुमदुमून गेले. स्थापना दिवसाचे औचित्य साधून, मातृशक्ती ह्यांनी फुगडी, फेर धरून थिरकल्या, त्यांचाही आनंद ओसंडून वाहत होता. एकंदरीत कार्यक्रमात खरोखरच आनंदी आनंद होता. कार्यक्रमाचे नियोजन बाल संस्कार प्रमुख अनुराधा माने ह्यांचे होते. परंतु त्यांचे निर्देशनाने संपूर्ण कार्यक्रम, व्यवस्था, सजावट, सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी सांभाळले. त्यामुळे खरोखर त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते. त्यांचे खूप कौतुक. मातृ शक्ती विभावरी चवळे, मेघा एकापुरे, संध्या फाये ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थांना बक्षीस वाटप करण्यात आले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *