बांगळकर शाळेच्या संकुलातील गाळे लिलाव नियमानुसारच!

तुमसर : शहरातील नगर परिषद बांगळकर शाळेच्या संकुलातील १२ गाळे आणि त्यांचे लिलाव मधल्या काळात राजकीय वातावरण तापविणारे ठरले होते. तत्कालीन भाजपच्या सत्ता पक्षाने त्या गाळ्यांचे लिलाव आपल्या राजकीय सहकाºयांना फायदा पोहचविण्याच्या उद्देशाने केल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. त्यातून आंदोलने उभारून भारतीय जनता पक्षाला टार्गेट देखील करण्यात आले होते. मात्र नगर परिषदेच्या चौकशीत त्या लिलाव प्रक्रियेत ९ गाळ्यांत कसलाच घोळ झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. तशी माहिती नपचे अधिकारी सावके यांनी दिली आहे. त्यातील तीन गाळे धारकांनी तत्कालीन लिलावाची रक्कम भरली नसल्याने त्या दुकानांचा फेर लिलाव विवादात फासला होता. तो प्रकार सध्या चौकशीत आहे. त्याच तीन गाळ्यांचे लिलाव मंगळवारला पार पडले आहे. नगर परिषद तुमसर येथील एका कर्मचाºयाने आपल्या परिवाराला फायदा पोहचविण्याच्या हेतूने बंगाळकर शाळेतील तीन गाळे भाडे तत्वावर प्राप्त केले होते. राष्ट्रवादी पक्षाने त्या तीन गाळ्यांवरून भाजपला टार्गेट केले होते. राष्ट्रवादीची ती उठाठेव बालिश ठरल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळेयांनी व्यक्त केली आहे. विवादित तीन गाळे वगळता उर्वरित ९ मध्ये कसलाच घोळ झालेला नाही. ती लिलाव प्रक्रिया ओपने बिडिंग मधून आॅनलाईन पद्धतीने पार पडली. त्यात पद निरस्त झाल्यावरच अनेकांनी त्यात सहभाग घेतला. तसा अहवाल नपने आपल्या चौकशीत तयार केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने भाजप वर केलेले आरोप पुन्हा खोटे ठरल्याचे पुढे आले आहे. बांगळकर शाळेच्या संकुलातील फक्त ३ गाळे नपने लिलावात घेऊन त्याची प्रक्रिया मंगळवारला पार पडली. सदर लिलावातून विरोधक तोंडघशी पडल्याची प्रतिक्रिया पडोळे यांनी व्यक्त केली आहे.

‘बांगळकर शाळेतील गाळे लिलावात कसलाच गैर प्रकार झालेला नव्हता. मात्र शहराच्या इतिहासात पहिल्यांदा आॅनलाईन लिलाव प्रक्रिया पार पडली. कमी अभ्यास असलेल्या विरोधकांनी त्यावरून नाहक राजकीय वातावरण तापविले, मात्र आपल्याच मुद्यावरून विरोधक तोंडघशी पडले आहेत.’

-प्रदीप पडोळे, माजी नगराध्यक्ष, नप तुमसर

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *