सोमलवाडा येथील स्मशानभूमीत अतिक्रमण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- तालुक्यातील सोमलवाडा येथे एकाने चक्क स्मशानभूमीतच अतिक्रमण केल्याने नवीन चचेर्ला पेव फुटले आहे. जुने स्मशान शेड वापरा योग्य नसल्याने ग्रामपंचायती अंतर्गत प्रस्ताव पाठवून नवीन स्मशान शेड तयार करण्यात आले. त्या स्मशान शेडचे उद्घाटन व लोकार्पण होण्याच्या आधीच गावातील एकाने त्याचा वापर स्वत:चे साहित्य ठेवण्यासाठी सुरू केला असल्याने स्मशान शेड कशासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच स्मशानभूमीत एका खाजगी शेतक?्याने तूळ व काही जागेत धान पिकाचे उत्पादन घेत आहे. त्यामुळे स्मशानभूमी कशासाठी असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला असून त्यांनी याची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली असून ग्रामपंचायती पदाधिका?्यांनी पाहणी करून तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे.

जीवनातील मरण हे शाश्वत सत्य असून मरणानंतर यातना भोगावे लागू नयेत म्हणून स्मशानभूमीत स्मशान शेड व इतर सोयी सुविधा केल्या जातात मात्र काही स्वार्थी प्रवृत्तीचे लोक त्याही जागेवर अतिक्रमण करीत असल्याने गावाच्या विकासाला खिळ बसत आहे. स्मशान शेडचा वापर अंतिम संस्कार करण्यासाठी केला जातो मात्र त्या ठिकाणी नागरिक आपले साहित्य ठेवत असल्याने त्या शेड चा उपयोग अंतिम संस्कार साठी की साहित्य ठेवण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे तर एका शेतकºयाने स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण करून तूळ व धान पिकाचे उत्पादन घेतले असल्याने त्या जागेचा उपयोग कशासाठी असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्याची दखल घ्यावी यासाठी गावातील नागरिकांनी ग्राम पंचायतीला शुक्रवारी (ता. १८ ) ला तक्रार केली असून तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *