तुमसरात श्री साईबाबा मंदिरात ३५ वा वार्षिक महोत्सव साजरा

वार्ताहर गोबरवाही : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्री साईबाबा मंदिर विनोबा भावे नगर तुमसर येथे श्री साईबाबा महोत्सव साजरा करण्यात आला. साईबाबा महोत्सव कार्यक्रमाची रूपरेखा नुसार सर्व प्रथम पहाटे ५ वाजता साईबाबा यांच्या मूर्तीचा गंगाजल आणि पंचामृतनी जलाभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता पासून महावीर रामायण मंडळच्या वतीने सुंदरकांड कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महावीर रामायण मंडळाचे अध्यक्ष व व्यासपीठ गायक बाळूभाऊ बडवाईक यांच्यासह गायक म्हणून गजानन केवट, सुधीर बडवाईक, बाल्याभाऊ तलमले, पॅड मास्टर मंगेश हिग्ने, ढोलक मास्टर संजय चेन्ने, आॅर्गन मास्टर प्रज्वल बडवाईक या सर्व कलाकारांनी गायन व सुरमय तालानी वाद्य वाजवीत मंदीर परीसर मंत्रमुग्ध केला. दुपारी १ वाजता पासून दहीकालाच्याकार्यक्रमाला सुरुवात झाली असून श्री साईबाबा मंदिरचे स्थापक दिलीप भुरे यांनी निर्धारित वेळेवर दहीहंडी फोडून दहीकाला कार्यक्रमाची शेवट आरती व प्रसाद वितरणने केली. साईबाबा महोत्सव कार्यक्रमाच्या समय सारणीनुसार सायंकाळी ४ वाजतापासून सर्व गावकरी साई भक्तांकरीता महाप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसाद आयोजन समिती व श्री साईबाबा मंदिरचे व्यवस्थापक सुजय भुरे, साई भुरे, श्रेयस भुरे, कालूभाऊ चाचीरे, महिला भक्तीनीगण मधून रिता भुरे, जयवंता भुरे, यशोदा कवरे, सुनिता चाचीरे, मीना बागडे, या सर्व साई भक्तांनी महाप्रसाद वितरण करण्यास मदत केली. श्री साईबाबा महोत्सव करिता आलेले सर्व भक्तांनी श्री संत साईबाबाचे दर्शन घेत महाप्रसादीचा लाभ घेतला असून सर्वांच्या अथक सहकार्याने श्री साईबाबा महोत्सव वार्षिक सोहळा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *