दहावीच्या जुन्या परीक्षा केंद्राला बोर्डाची मंजुरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शशांक विद्यालय कवडशीच्या दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना जुने परीक्षा केंद्र मिळाल्याचे ई-मेल धडकले व एआयएसएफच्या लढ्याला शेवटी यश मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दि. २७ फेब्रुवारीला आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने भाकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड हिवराज उके, एआयएसएफचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. वैभव चोपकर व सचिव कॉम्रेड मिनाक्षी मेहर यांच्या नेतृत्वात शशांक विद्यालय कवडशीच्या दहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीचे बेला हेच परीक्षा केंद्र मिळावे म्हणून शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा समोर शाळेचे विद्यार्थी व पालकांनी धरणे आंदोलन केले. शाळा आणि व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता शिक्षणाधिकाºयांच्या शिफारसीने नागपूर बोर्डाने गैर कायदेशीररित्या जुने बेला हे परीक्षा केंद्र बदलून कोंढी हे नवीन केंद्र देण्यात आले. शाळा वविद्यार्थ्यांच्या दृष्टीने कोंढी हे केंद्र सुमारे १५ किलोमीटर लांब, जंगलाचा खराब रस्ता व आवागमनाच्या संसाधनांचा अभाव व गैरसोयीचे असल्याने हे विद्यार्थी व पालकांना मान्य नव्हते. सदर केंद्र बदलून मिळावे म्हणून आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने दि. २७ फेब्रुवारीला ११ वाजेपासून शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा समोर शाळेचे ३८ विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकांनी धरणे आंदोलन सुरू केले. मात्र हा बोर्डाचा निर्णय असल्याचे सांगून शिक्षणाधिकाºयाने टाळाटाळ करण्याच्या प्रयत्न केला.

तेव्हा शिष्टमंडळाच्या वतीने कॉम्रेड हिवराज उके यांनी शिक्षणाधिकाºयाला खडसावून सांगितले की, हा बदल तुमच्या शिफारसीमुळेच झाले असल्याने सायंकाळी पाच वाजेपर्यंत जुने परीक्षा केंद्र बदलून मिळाल्याचे मंडपात कळविण्यात यावे, अन्यथा त्यानंतर तुमच्या कार्यालयीन कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात येईल. जेंव्हा साडेपाच वाजता विद्यार्थी व पालकांचा जत्था कार्यालयाकडे प्रस्थान करू लागला तेव्हा पोलीस कर्मचाºयांनी सांगितले की, आत मध्ये जाऊ नका, लवकरच तुम्हाला परीक्षा केंद्र बदलीचे पत्र मिळणार आहे. परीक्षेचा अभ्यास सोडून प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला ही शोकांतिका आहे. मात्र आंदोलनाच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास करायला लावण्यात आले व अभ्यास कसा करावा              याबद्दल कॉम्रेड वैभव चोपकर (विद्यापीठ टॉपर) यांनी माहिती दिलीत्र तर शहीद भगतसिंग व संघटनेच्या ध्येय धोरणांची माहिती कॉ. हिवराज उके यांनी दिली. शेवटी सुमारे सात-साडेसात वाजता जुन्या परीक्षा केंद्राला मंजुरी मिळाल्याचे बोर्डाचे ईमेलचे परिपत्रक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पानझाडे यांनी आंदोलनाच्या मंडपात घेऊन आले व आंदोलनकर्त्या विद्यार्थी व नेत्यांना दिले आणि एकच जल्लोष करीत घोषणाबाजी करीत आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी शशांक विद्यालयाचे ३८ विद्यार्थी, पालक व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने कॉम्रेड हिवराज उके, कॉम्रेड वैभव चोपकर, कॉ. मीनाक्षी मेहर, पालक तेमदेव तीतिरमारे, जितेंद्र गजभिये, रवींद्र पागाडे, सुरजसिंग जाटव, महेश लुटे, विकी ठवकर, कॉम्रेड गजानन पाचे, कॉ. वामनराव चांदेवार व कॉ. राजू लांजेवार इत्यादींचा समावेश होता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.