डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणाºयावर कारवाई करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलुन (शिवीगाळ करून) लोकांच्या धार्मीक भावना दुखावणाºया जितेंद्र अनिल भोगे वय ३२ वर्षे रा.पेट्रोलपंप (ठाणा) याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. आरोपी जितेंद्र अनिल भोगे हा आॅर्डनन्स फैक्टर जवाहरनगर येथे नोकरीला असून नेहमी दारु पिवून कुणालाही शिवीगाळ करित असतो. त्याने एक ते दिड वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी शिवीगाळ करुन जवाहरनगर परीसरात तणावाचे वातावरण निर्माण केले हो.

याची लेखी तक्रार आयुध निमार्णी, जवाहरनगर येथील सुरक्षा अनुभाग मध्ये करण्यात आली होती. दि. १५ आॅगस्ट २०२३ रोजी सकाळी १२.४५ वा. तक्रारदार हे घरी असतांना त्यांचे मित्र मंगेश कºहाडे रा. जवाहरनगर यांनी त्या मोबाईलवरून फोन करुन सांगितले की, सकाळी ०९/३० वा. दरम्यान आरोपी जितेंद्र भोगे हा त्याचे मोटार सायकलने जवाहरनगर कडून पेट्रोलपंप (ठाणा) कडे जात असतांना सुयोगनगरचे दरम्यान लॉन समोरील डांबरी रोडावर जोराजोरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अश्लिल शब्दात शिवीगाळ करीत पेट्रोलपंप (ठाणा) कडे निघून गेल्याचे त्यास त्याचे मित्र भिमराव आमटे रा. जवाहरनगर यांनी सांगितले असल्याचे सांगीतले. त्यावर अर्जदाराने ठिक आहे, त्याला विचारून पाहू असे बोलून फोन ठेवला.

आज जवाहरनगर येथे दैनीक बाजार असल्याने , सायंकाळी ६ वा. सुमारास तक्रारदार व त्यांचे मित्र मोहनीस बळीराम कांबळे रा. जवाहरनगर असे मिळून भाजीपाला घेण्या करिता बाजारात गेले असता त्यावेळी आरोपी जितेंद्र भोगे हा तिथे बाजारात दिसुन आला तेव्हा तक्रारदाराने त्याला तु सकाळी बाबासाहेबांना शिवीगाळ का करित होतास अशी विचारणा केली असता आरोपी ने जोराजोरात ओरडून मैने बाबासाहेब को गाली दिया, तुम्हाला जे करायचे ते करा ह्ण असे बोलू लागला. त्याचा जोराजोरात ओरडल्याचा आवाज ऐकूण परिसरातील चंद्रशिल नागदेवे, पारस भिमटे, रंजित कान्हेकर व शैलेश गोंडाणे सर्व रा. जवाहरनगर हे सुध्दा तिथे आले.

त्यांनी सुध्दा आरोपीला तु विणाकारण बाबासाहेबांना का शिवीगाळ का करतोस असे त्यास विचारणा केली असता आरोपीने परत ह्य हा मी बाबासाहेबांना शिव्या दिल्या ,तुम्हाला जे काही करायचे ते करा असे बोलला.हा गोंधळ बघुन बाजाराचे ठिकाण उपस्थित इतर लोकही तिथे जमा झाले होते. गदीतील जमलेल्या लोकांना पाहून सुध्दा आरोपी हा शांत न बसता उलट तक्रारदारार व त्याच्या मित्राला मारण्यास धावू लागला. गदीर्तील काही नागरीकांनी याची माहिती लगेच पोलीसांना दिली व काही क्षणातच पोलीस तिथे पोहचले. पोलीसांना बघुन आरोपीने पळ काढण्याचा प्रयतन केला मात्र तिथे उपस्थित नागरीकांनी त्याला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन केले. आरोपी जितेंद्र अनिल भोगे याने महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत करीता आरोपी जितेंद्र भोगे याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी जवाहर नगर पोलीसात दिलेल्या तक्रारीतुन करण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.